जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

ग्राहकांनी सदैव जागरुक ग्राहक असावे ; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन...

पुणे : बाजारामध्ये अनेक प्रकारे फसवणूक होऊ शकते ती टाळण्यासाठी ग्राहकांनी सदैव जागरूक ग्राहक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वारगेट मेट्रो स्थानक येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अनिल जवळेकर बोलत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश कांबळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील उपस्थित होते.

अनिल जवळेकर म्हणाले की, वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने जागरुक असणे आवश्यक आहे. आपल्या जागरुकतेमुळे दुसऱ्या एखाद्या नागरिकाची फसवणूक वाचू शकते. सर्वसामान्य जनतेला बाजारामध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होऊ शकते याची माहिती या प्रदर्शनातून चांगल्या प्रकारे मिळेल. दुकानदारांनी आणि विभागांनी आपली जबाबदारी पार पाडताना ग्राहकाला दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध द्याव्यात जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी दाद मागावी लागू नये, असेही ते म्हणाले.

तुषार झेंडे पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण परिषदेची जबाबदारी ही ग्राहक संरक्षणाचे कायदे व ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती व जाणीव करुन देणे ही आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना लेखी बिल किंवा पावती घेणे. उत्पादन, उत्पादनाची तारीख, वापराची कालमर्यादा, किंमत, उत्पादन करणारी कंपनी आदी माहिती वस्तूवर छापणे बंधनकारक असून खरेदी करताना ग्राहकांनी ही बाब तपासून घेणे गरजेचे आहे. आता ऑनलाइन सेवा व खरेदीतही ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. यासाठीही ऑनलाईन तक्रार दाखल करता येते, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैधमापन शास्त्र, जिल्हा व सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, बीएसएनएल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यावतीने स्टॉल लावण्यात आले होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??