आरोग्यजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“धक्कादायक” बेकायदा अद्ययावत रुग्णालय, रुग्णांच्या जीवाशी खेळ, अनेक प्रकारच्या बेकायदा शस्त्रक्रिया केल्याचा अंदाज : सासवड

पुणे (सासवड) : वैद्यकीय अधीक्षक तसेच शासनाची कोणतीही परवानगी न घेता ओपिडीच्या नावा खाली तब्बल २५ बेडचे रुग्णालय थाटून तब्बल दीड वर्षे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एवढेच नाही तर गेल्या दीड वर्षात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्याचेही निदर्शनास आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे पुरंदर तालुक्यासह जिल्हात खळबळ उडाली आहे.

सासवड हिवरे रस्त्यावर डॉ. गणेश जगताप यांचे दिव्य आरोग्यम आणि क्रिटीकेअर नावाने हॉस्पिटल थाटले. असून याच हॉस्पिटलच्या दर्शनी भागात ओंकार जगताप यांच्या पत्नी प्रतीक्षा दिघे यांचे दिव्य आरोग्यम मेडिको नावाने औषधांचे दुकान आहे. पत्नीच्या दुकानात नेहमी येणेजाणे होते. दरम्यान रुग्णालयात लावलेल्या बोर्डवर ज्या डॉक्टरांची नावे लिहिली आहेत ते डॉक्टर नियमित येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी अधिक माहिती घेतली असता हे रुग्णालयच बेकायदा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खात्री करण्यासाठी सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन आकमार यांच्याकडे लेखी अर्ज करून माहिती मागितली. मात्र संबंधित रुग्णालयाची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

ओंकार जगताप यांनी सासवड नगरपालिकेकडे लेखी पत्र देवून रुग्णालयाच्या परवानगीबाबत माहिती विचारली असून याबाबत अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, पुरंदर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप यांच्याकडे निवेदन देवून माहिती मागितली असता त्यांनी ही हे डॉक्टर मेडिकल असोशिएशनचे सदस्य नसल्याचे सांगितले आहे. एकूणच तब्बल दीड वर्षे प्रशस्त हॉस्पिटल थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणारे डॉ. गणेश जगताप यांना कोणाचे अभय आहे ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते ओंकार जगताप यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, नगरपालिका, पोलीस ठाण्यामधून डॉ. गणेश जगताप यांना फोन करून त्यांची विचारणाही केली. तसेच याबाबत हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरांना समजताच सर्व डॉक्टरांनी काढता पाय घेत हॉस्पिटलला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य खूप वाढले आहे. त्यामुळे डॉ. गणेश जगताप यांच्यावर तातडीने कारवाई करून हॉस्पिटल बंद करण्याची मागणी ओंकार जगताप यांनी केली आहे.

हॉस्पिटल मोठे नसून केवळ ओपीडीच… 

दिव्य आरोग्यम हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश जगताप यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आमचे हॉस्पिटल मोठे नसून केवळ ओपीडी असल्याचे सांगितले आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले आहे.

या अशा घटनेने सासवड सह पुणे जिल्ह्यात असे किती बेकायदेशीर हाॅस्पिटल आहेत. याची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी होणे गरजेचे…

डॉ. गजानन आकमार, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, सासवड

संबंधित दिव्य आरोग्यम हॉस्पिटल बाबत आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांनी ऐनवेळी अपूर्ण फाईल देण्याची गडबड केली होती, मात्र त्यामध्ये सर्व परवानग्या अद्याप घेतल्या नसल्याचे दिसून आल्याने सदर फाईल न स्वीकारता लगेच परत केली आहे. तसेच विनापरवाना हॉस्पिटल सुरू केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??