जिल्हासामाजिक

शिवजयंती निमित्त शेवाळवाडीमध्ये राजे क्लब ट्रस्ट च्या वतीने व्याख्यान व विविध कार्यक्रमांचे आयोजन, राजे क्लब संस्थापक अध्यक्ष अमित पवार

पुणे (हवेली) : छत्रपती शिवरायांची जयंती पूर्ण भारतभर अभूतपूर्व उत्साहामध्ये साजरी केली जाते. महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन यानिमित्ताने व्हावे यासाठी राजे क्लब ट्रस्टच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी राजे क्लब ट्रस्ट शेवाळवाडी यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत केसरी प्रतिष्ठान च्या वतीने पौराणिक वांद्याचे सादरीकर करण्यात आले. यामध्ये संबळ, डमरू, शिंगी, संबळ, झान्झ आणि शंख या पारंपारिक वाद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण उमेश गडे, संजीव पडवलकर व टीम यांनी केले.

तसेच नितीन शेलार व सहकारी यांच्या शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे केले. लहान मुलांनी लाठी काठी, भाला, तलवार बाजी यांच्या साहाय्याने साहसी खेळ सादर केले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान केले. सद्य स्थिती मध्ये महाराजांचे विचार अंगीकारून तरुणांनी महाराष्ट्र पुढे नेले पाहिजे असे प्रा. शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे उपस्थित होता. त्याच्या त्याच्या अनोख्या पद्धतीने उपस्थितांचे मनोरंजन केले.


पुरंदर हवेली मतदार संघाचे आमदार आणि माजी जलसंद मंत्री विजय बापू शिवतारे यांचा नागरी सत्कार शेवाळवाडी-मांजरी भागातील लाडक्या बहिणींच्या झाला. याप्रसंगी शेवाळवाडी गावासाठी बंद नळाने पाणी देण्यासाठीचा DPR येत्या २ महिन्यात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच सामाजिक कार्य करण्याऱ्या राजे क्लब संस्थेचा पाठीशी नागरिकांनी उभे राहावे असं आवाहन उपस्थितांना केले.

आंतरराष्ट्रीय कार रेसर निकिता टकले, धाडसी पोलीस विजय ढाकणे आणि राजेंद्र करंजकर, आणि नुकतीच सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेली मानसी शेवाळे यांचा सत्कार आमदार शिवतारे बापूंच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक श्री धनंजय पिंगळे, मांजरी गावचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले, संदीप बापू हरपळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, उद्योजक किरण पवार, सुभाष नाना मेमाणे, शिवराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुणाल माने, उज्वल कुमार यादव (सेल्स अँड मार्केटिंग हेड शापूरजी पालनजी ग्रुप), महेश टेले पाटील संपादक न्यूजमकेर, मा उपसरपंच प्रमोद कोद्रे, सुधीर घुले, मा सरपंच अशोक शिंदे, लोकमत सखी मंच हडपसर प्रमुख हर्षदा पाटील, मनीषा हिंगे राऊत, छाया गदादे सरचिटणीस भाजपा हडपसर, गणेश कामठे, तुषार कामठे, मनोज कामठे, आप्पा कुंजीर, राजू सूर्यवंशी व राजे क्लब चे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व शेवाळवाडी मा. उपसरपंच अमित पवार पुढे म्हणाले.

शेवाळवाडी-मांजरी परिसरातील नागरिकांनी व्याख्यान ऐकण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली होती. यानिमित्ताने महारांचे विचार जनमानसात रुजतील व त्यामधून सुधृढ पिढी निर्माण होण्यास मदत होईल.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??