महाराष्ट्रशिक्षणसामाजिक

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठ पुन्हा ‘क्यूएस’ रँकिंगमध्ये, डॉ.मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी, विद्यापीठ…

पुणे ( हवेली) : विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना पुन्हा क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२५ (वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली आहे. संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयडी या तीनच संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे.

या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते.
एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी या शाखांत जागतिक दर्जाचे नाविण्यपूर्ण शिक्षण पुरवत आहे. त्यामुळे विद्यापीठाला या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यभरातून एमआयटी एडीटी विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ.मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी, विद्यापीठ, पुणे

एमआयटी एडीटी विद्यापीठाला गतवर्षी प्रमाणे याही वर्षी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून ती सर्वांच्या कष्टाची पावती आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली असून, संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयटी या संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??