लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रुपांतर वादावादीत झाल्याने दोन गटात दगडफेक झाल्याची गंभीर घटना, ३५ जणांवर गुन्हा तर १० जणांना अटक..कदमवाकवस्ती.

पुणे (हवेली) : लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रुपांतर वादावादीत झाल्याने दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ३५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केले असून १० जणांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात असलेल्या इराणी गल्लीत मंगळवार (४ मार्च) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अमिरु खानु ईराणी (वय ५२, रा. ईराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या मसाट ऊर्फ गुलाम मजलुम ईराणी, हसन ऊर्फ मन्ता मजलूम ईराणी, मोसन लालु ईराणी, मजलूम गुट्टेल हाजीसाब ईराणी, मरिअम मोसन ईराणी, अवनु ऊर्फ अलीरजा राजु ईराणी, महंमद मोसन ईराणी ऊर्फ गोजु, शाजमान ऊर्फ पठाण हाजीसाब ईराणी, राजु हौजी ईराणी, मरीअम मजलूम ईराणी, सिमु हाजीअली ईराणी, ममाई ऊर्फ फिल्मा हाजीअली ईराणी, नफीसा ऊर्फ मसाट फेरोज ईराणी, नफीस मसाट ऊर्फ गुलाम ईराणी, शब्बीर जावेद जाफरी ईराणी व इतर इसम (सर्व रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, पुणे) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजलूम हाजीअली सय्यद (ईराणी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमिरु खानु ईराणी, सिवी मंजुरी ईराणी, किमला मंजूर ईराणी, फातु मंजुर ईराणी, मुक्तार सय्यद ईराणी, अली अक्रम ईराणी, जीनद अली ईराणी, ईसफ सलीम ईराणी, सोहरा ईसफ ईराणी, शबाना अक्रम ईराणी, सकीना अक्रम ईराणी, मोहंमद नासर ईराणी, हैदर सलीम ईराणी, जेहरा जाफर ईराणी, मोहंमद इम्रान ईराणी, हैदर अली ईराणी, आब्बास ईसफ ईराणी, कासीम सलीम ईराणी, मोहंमद सय्यद ईराणी व इम्रान फेरोज ईराणी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार अमिरु ईराणी याचा चष्माविक्रीचा धंदा आहे. तर मजलूम सय्यद हे रिक्षाचालक आहे. या दोघांमध्ये लहान मुलांच्या भांडणांवरून वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात दोन्हीकडील लोकांनी विरुद्ध गटातील लोकांना लोखंडी रॉड, धारदार हत्यार व दगडांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, महेश चव्हाण, संदीप जोगदंड, निशा कोंढे, प्रशांत कळसकर, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, मंगेश नानापुरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तणावाची परिस्थिती संवेदनशीलपणे योग्य हाताळून भांडणे मिटवली. व या भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पथके तयार करून मंगळवारी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये मजलूम ईराणी, अक्नु ऊर्फ अलीरजा ईराणी, महंमद मोसन ईराणी ऊर्फ गोजु, राजु ऊर्फ हुसेन हाजी ईराणी, शहाजवान ऊर्फ पठाण ईराणी, शब्बीर जावेद जाफरी/ईराणी, मोहम्मद राजु ईराणी, हैदर सलीम ईराणी, मोहम्मद सय्यद नुर ईराणी व मुक्तार सय्यदनुर ईराणी या१० जणांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, विलास शिंदे, प्रदीप गाडे, सुनील नागलोत, पोलीस अंमलदार शैलेश कुदळे, चक्रधर शिरगिरे, योगेश पाटील, बाजीराव वीर, राहुल कर्डिले यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.



