
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती, लहुजी शक्ती सेना आणि भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती ‘शासन आपल्या दारी’ या लोकोपयोगी उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी कदमवाकवस्ती गावचे नवपरीवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, ग्रा. सदस्य अविनाश बडदे, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली सतिष काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, युवा नेते ज्ञानेश्वर नामूगडे, संघर्ष महिला समूहाच्या अध्यक्ष वैशालीताई सकट आदी मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊंच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन…
चित्तरंजन गायकवाड आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी व्यक्त केले की, “अण्णाभाऊ साठे यांची जयंती केवळ औपचारिकतेत न साजरी करता, नागरिकांच्या खऱ्या गरजा पूर्ण करणाऱ्या अशा योजनांद्वारे साजरी करणे, हेच त्यांना खरे अभिवादन आहे.”
नागरिकांना थेट लाभ…
कार्यक्रमात आधार कार्डसंबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. विधवा व वृद्ध महिलांना आवश्यक कागदपत्रांबाबत सहाय्य करण्यात आले. रेशनिंग कार्डचे सर्व्हर डाऊन आणि ४४,००० उत्पन्न प्रमाणपत्राच्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी २०० ते २५० अर्ज स्वीकृत करण्यात आले.
या उपक्रमाला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ आणि लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे यांनी नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले.
प्रशासनाची हमी…
लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष विजय विठ्ठल सकट यांनी अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याशी रेशन कार्ड विषयावर चर्चा केली असता, नियमात बसणाऱ्या नागरिकांचे रेशन त्वरित चालू करण्याची व ४४,००० उत्पन्न दाखला देण्याची हमी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोडके व दीपक काळभोर यांनी केले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अभिजीत पचकुडवे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आकाश मात्रे, रोहन सपकाळ, सुहास काळभोर, अमर ननवरे, सुजल शेंडगे, सागर भाले, मयूर सकट, कमलेश सकट, किरण मात्रे तसेच महिला मंडळातील वर्षा भिसे, शोभा सकट, निर्मला चांदणे, आरती मोरे, सविता मोरे, शिल्पा मात्रे, शुभांगी शिंदे, सीमा अडागळे, सुवर्ण मात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Editer Sunil thorat



