शिक्षण
गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलचा रयतचा, वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात…

पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समांरभ नुकताच उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडीचे सदस्य दिलीप तुपे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडीचे सदस्य अरविंद तुपे या कार्यक्रमास उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे माजी सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, यांची विशेष उपस्थिती होती.
स्कूलमध्ये विविध स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका झिनत सय्यद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. शिक्षक पालक संघाचे सदस्य, पालक आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.



