पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी काढले आदेश, शिरूर पोलीस ठाणे हददीतील २ वर्षासाठी आरोपी तडीपार…

पुणे (शिरुर) : ” पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी शिरूर पोलीस ठाणे हददीत व करडे-सरदवाडी एम.आय.डी.सी येथे दहशत करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संकेत महामुनी टोळीमधील टोळी सदस्य घ्या उर्फ अभिषेक मिसाळ, शुभम दळवी, गणेश उर्फ श्रीरंग महाजन यांना केले २ वर्षासाठी तडीपार / हददपार”
शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये २०१६ ते सन २०२४ या कालावधीमध्ये टोळीप्रमुख १) संकेत संतोष महामुनी रा. सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे याने त्याची एक स्वंतत्र टोळी दरवेळी नेहमीचे टोळीसदस्य २) घ्या उर्फ अभिषेक हनुमान मिसाळ वय २३वर्षे रा. सोनारआळी शिरूर ता. शिरूर जि.पुणे ३) शुभम दत्तात्रय दळवी रा. प्रितमप्रकाशनगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे ४) गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन वय ३०वर्षे रा. गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे यांचेसह व काही नव्याने साथीदार घेवुन निर्माण केली होती.
सदर टोळीने एकत्रीतरित्या शिरूर पोलीस ठाणे हददीत मध्ये, रांजणगाव एम.आय. डी. सीमध्ये व शिरूर तालुक्यामध्ये गावठी पिस्तुलाचा वापर करून खुन करण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, गंभीर व साधी दुखापत करणे, बेकायदेशिर जमाव जमवुन गुन्हा करणे, बेकायदा घातक हत्यारे गावठी पिस्तुले राजरोस सरासपणे जवळ बाळगणे गुन्हे करणेसाठी चिथावणे अशा प्रकारचे गुन्हे वेळोवेळी केले आहेत. या टोळी विरूध्द पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक शिरूर यांना सुचना दिली होती. त्या अन्वये पोलीस निरीक्षक शिरूर यांनी सन २०२४ मध्ये सदर टोळीविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाणे टोळीची पांगपांग होण्याकरीता प्रस्ताव मा. हददपार प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना सादर केला होता.
त्यावर सुनावणी होवुन पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी गंभीर दखल घेवुन सदर आरोपीतांना २ वर्षाकरीता पुणे जिल्हा (पिंपरीचिंचवड शहर व पुणे शहर हददीसह) अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन दि. २/४/२०२५ पासुन तडीपार/हददपार करण्यात आले आहे. संदेश केंजळे पोलीस निरीक्षक शिरूर यांनी यापुढील कालावधीतही शिरूर पोलीस ठाणे हददीत शिरूर तालुक्यामध्ये व औदयोगीक क्षेत्रांमध्ये दहशत व गुंडगीरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगीतले आहे.
वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार / हददपार करणेकामी प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग व अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, संदेश केंजळे पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अमंलदार सचिन भोई तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार महेश बनकर, रामदास बाबर तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, निखील रावडे यांनी कामकाज पाहीले आहे.
 
				 
					
 
					 
						


