
डॉ गजानन टिंगरे
पुणे : सामाजिक न्याय आणि समतेची शिकवण देणारे महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे ,उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी डॉ. शिवाजी वीर, डॉ.जयश्री गटकुळ, प्रा. विद्या गायकवाड, अभिमन्यू भंडलकर व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



