पुणे जिल्हा तलाठी संघ, शाखा हवेली, पुणे संघटनेकडून प्रकरणातून दादासाहेव झंजे ग्राममहसुल अधिकारी कोंढवा बु. यांचे नाव कमी करावे असा संबंधित प्रशासनास पत्रव्यवहार….
मा. उपविभागीय अधिकारी सो, हवेली. मा. तहसिलदार सो, हवेली/पिंपरी-चिंचवड/लोणीकाळभोर यांना पत्र...

पुणे : हवेली तालुक्यात बनावट सातबारा प्रकरणी दादासाहेब झंजे या तलाठ्यासह इतर तीन इसमांनी गुन्हा दाखल करण्याबाबत २ आॅगस्ट २०२३ रोजी घडल्या त्या घटने नंतर पुणे जिल्हा तलाठी संघ, शाखा हवेली, पुणे संघटनेकडून प्रकरणातून दादासाहेव झंजे ग्राममहसुल अधिकारी कोंढवा बु. यांचे नाव कमी करावे असा संबंधित प्रशासनास तात्काळ पत्रव्यवहार करण्यात आला. तो खालील प्रमाणे..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १५६ (३) मधील नियमांची अमल बजावणी न करता कोंढवा बु येथील ग्राममहसूल अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल केलेबाबत ..
१) कोंढवा पोलीस स्टेशन यांसकडील गुन्हा नोंद क्र. ३०४/२०२५ दी. १२/०४/२५
२) मा. जिल्हाधिकारी सो, यांसकडील पत्र क्र पमट/कावी / १०२३/२०२२ दी.०२/०९/२२
३) महाराष्ट्र शासन गृह विभाग परिपत्रक दी. ०४/११/२०१६
उपरोक्त विपयास अनुसरून आपणास सविनय निवेदन सादर करणेत येते की, संदर्भिय १ अन्वये मौजे कोंढवा वु येथील सर्व्हे क्र ६६/१ मध्ये फेरफार क्र ३८९१५ अन्वये बलविंदरकौर चंडोक यांची वारस नोंद आलेली असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९, १५० अन्वये कायदेशीर पूर्तता करून गावी फेरफार घेणेत आला असताना तक्रारदार यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे वारस नोंद बाबत गुन्हा दाखल केलेला आहे, सदर गुन्हा दाखल करीत असताना संदर्भ क्र २ व ३ नुसार गुन्हा नोंद करणेपूर्वी कार्यालय प्रमुख यांची पूर्वपरवानगी न घेता कोंढवा पोलीस स्टेशन यांचेकडून शासकीय कर्मचारी दादासाहेब झंजे ग्राममहसुल अधिकारी कोंढवा बु यांचेवर, गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक पाहता सदर फेरफार सन २०२३ साली आलेला होता त्या वेळेस सदर ग्राममहसूल अधिकारी दादासाहेब झंजे कोंढवा येथे कार्यरत नसताना त्यांचेवर गुन्हा दाखल केलेला आहे ही बाब खेदजनक असून शासकीय काम करीत असताना अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर कर्मचारी यांचे विनाकारण मानसिक व कौटुंबिक स्वास्थ विघडत आहे, तसेच काहीही दोष नसताना कुटुंबात, समाजात, व कार्यालयीन कामकाज करीत असताना त्यांची प्रतिमा मलीन होऊन संभंधित कर्मचारी यांचे खच्चीकरण होते. तसेच सदर प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यातील ग्राममहसुल अधिकारी व मंडळअधिकारी यांचे मध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
वरील प्रकारणामुळे पुणे जिल्ह्यात महसूल मध्ये कामकाज करीत असताना कोणतीही चौकशी न करता जाणून बुजून पोलीस स्टेशन द्वारे कार्यालय प्रमुख यांची पूर्वपरवानगी न घेता गुन्हा नोंद होऊ नये या करिता तसेच वरील प्रकरण मध्ये चुकीची कार्यवाही केली त्या संबधित पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई होणे कामी आपले स्तरावर आपण पोलीस आयुक्त पुणे यांना सूचित करावे व सदर प्रकरणातून दादासाहेव झंजे ग्राममहसुल अधिकारी कोंढवा बु. यांचे नाव कमी करावे ही विनंती, दिनांक २२/४/२५ पर्यंत सदर गुन्हयामधून नाव कमी न झालेस संपूर्ण पुणे जिल्हा मधील सर्व ग्राममहसूल अधिकारी व मंडळअधिकारी हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार असून हीच आंदोलन नोटिस ग्राह्य धरून संपूर्ण जबाबदारी प्रशासन ह्यांची राहील. असा पत्र व्यवहार करण्यात आला आहे.




