जिल्हा

बनावट सातबारा फेरफार प्रकरणात “काम केले ताईने पोलिसांनी गुन्हा दाखल केला दादावर..”

Pune - In the fake Satbara modification case, "Tai did the work, the police registered a case against Dada.."

पुणे : बनावट सातबारा फेरफार प्रकरणात “काम केले ताईने पोलिसांनी गुन्हा दाखल केला दादावर..”

कोंढवा बुद्रुक येथील पोलीस स्टेशनमध्ये हवेली तालुक्यातील तलाठी दादासाहेब शंकर झंजे यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात तलाठी झंजे यांनी तो फेरफार केला नसल्याने काम केले ताईने गुन्हा दाखल झाला दादावर त्यामुळे पोलीस खात्यात व महसूल खात्यात मोठी खळबळ उडाली आहे

संबंधित वारसनोंद ही कोंढवा बुद्रुक येथील सर्वे नं ६६/१ व फेरफार नं ३८९१५ हा अर्चना दिनकर वणवे नामक तलाठी यांनी 02/08/2023 या तारखेला फेरफार नोंदणी केली आहे.व तत्कालीन खेडशिवापूर मंडळ अधिकारी व्यकंटेश रामचंद्र चिरमुल्ला यांनी १७/१०/२०२३ रोजी सदर वारसनोंदनी फेरफार प्रमाणित केला आहे.

तलाठी दादासाहेब झंजे यांचा या बनवट कागदपत्रे सातबारा करणे प्रकरणात कोणताही संबंध दिसत नसल्याने झंजे यांचे नाव पोलीस FIR मधून काढून टाकण्याची मागणी पुणे जिल्हा तलाठी संघाने केलेली आहे.

“काम केले ताईने गुन्हा मात्र दाखल केला दादावर”

तलाठी दादासाहेब झंजे यांच्यावर दाखल झालेल्या बनवट कागदपत्रे तयार करून वारसनोंद प्रकणार कोणताही संबंध नसल्याचे सदर कोंढवा बु. मधील सर्वे नं ६६/१ व फेरफार क्र.३८९१५ मध्ये फेरफार नोंदणी करणारे तलाठी व प्रमाणित करणारे मंडळअधिकारी यांची स्पष्ट दिसत असल्यामुळे झंजे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यातून तलाठी यांचे वगळण्याची मागणी हवेली तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. २२ एप्रिलपर्यंत प्रस्तुत गुन्ह्यातून तलाठयांचे नाव कमी न झाल्यास पुणे जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती तलाठी संघटनेने दिली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??