डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ; समीक्षा थोरात
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन...

पुणे : ज्या काळात भारतात शिक्षण मिळणे दुरापास्त होते त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्यांनी न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे इथली गुलामगिरी नष्ट करण्याचे काम केले.

इथल्या स्त्रिया,वंचित, शोषित, कष्टकरी, दलितवर्गाला त्यांचे हक्क व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. भारताला एकसंध राखण्यासाठी नवी मूल्य व्यवस्था निर्माण केली. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. असे प्रतिपादन बाल व्याख्याती समीक्षा थोरात यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाल व्याख्याती समीक्षा थोरात हिच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ. रमाकांत जोशी, डॉ. अजय कवाडे, प्रा. अनिल देवकाते, डॉ. उज्वला खिस्ती, शिवाजी सोनवणे, महेंद्र थोरात, चांगदेव पोमन, सचिन शिंदे, राजू आवटी, साधना काळेभोर, आशा बांदल तसेच विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले तर आभार डॉ. विलास मोरे यांनी मानले.



