क्राईम न्युज

संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा टोळी प्रमुख व गुन्हेगारी टोळी वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत कारवाई…

पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३),१९०, आर्म अॅक्ट ३(२५), २७ ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयाचा तपास श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, शंकर सांळुखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरज बेंद्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास करुन सदर गुन्हयामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे

१) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं.६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी बिबवेवाडी पुणे (टोळी प्रमुख) असुन २) सलमान हमीद शेख वय २५ वर्षे, रा. सिध्दी हॉस्पीटल जवळ, दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर धनकवडी पुणे (टोळी सदस्य), ३) हर्षल संतोष चव्हाण, वय १९ वर्षे रा. पवळे चौक, क्रांतीवीर मित्र मंडळ, भंडारी मेडिकल शेजारी भटङ यांचे घरात कसबा पेठ पुणे (टोळी सदस्य) यांना लागलीच अटक करून तपास करण्यात आलेला आहे. ४) शक्ती गुरव रा.लातूर पुर्ण नाव पत्ता माहित नाही (पाहिजे आरोपी) याचा शोध चालू आहे.

गुन्हयाचे तपासा दरम्यान (टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं.६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी बिबवेवाडी पुणे याने टोळीमधील इतर सदस्यांना बरोबर घेवुन दखलपात्र गुन्हे करुन टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापित करुन त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैच आर्थिक फायदा मिळविण्याच्या उददेशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुन-जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैध मार्गाने घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवुन मारहाण करणे व जबरदस्तीने त्यांचेकडील मालमत्ता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, इत्यादी प्रकारचे गुन्हे या गुन्हयाव्दारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन असे गभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. (टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव याने व त्याचे संघटित टोळीने लोकांनमध्ये दहशत पसरुन स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणे करीता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२).३(४) प्रमाणे कलमे समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शंकर साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे शहर यांनी तयार करुन राजकुमार शिंदे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्फत मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना पाठविला होता.

मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी गुन्हयाचे झाले तपासाचे कागदपत्रांची पडताळणी करुन व आरोपींचा पूर्व इतिहास तमासुन वर नमुद आरोपी नाव (टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं.६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी बिबवेवाडी पुणे व त्याचे वरील ०२ साथीदार यांचे विरुध्द नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३ (४) प्रमाणे अंतर्भाव करण्याची मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

सदर उल्लेखनिय कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मनोज पाटील कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली शंकर सांळुखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरज बेंद्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोलीस उप निरीक्षक अशोक येवले तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव पोलीस हवा. प्रशांत धोत्रे, संतोष जाधव पोलीस अंमलदार अनिल कर्चे, प्रतिक करंजे, बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांनी केला आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??