जिल्हासामाजिक

गुटखा-पान मसाल्याची टपऱ्यांवर खुलेआम विक्री ; पोलीस कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह…

लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परीसरात गुटखा बंदीचा फज्जा?

लोणी काळभोर (ता. हवेली) : अवैध व्यवसाय पूर्णतः बंद केल्याचा प्रशासनाचा दावा वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट असल्याचे चित्र समोर येत आहे. अवैध दारूविरोधात पोलीसांकडून कारवाई होत असली, तरी गुटखा व पान मसाल्यासारख्या बंदी घातलेल्या पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कांबळे वस्ती येथील अवैध गुटखा कारखाना उघडकीस आल्यानंतर काही दिवस लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात कडक कारवाईचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही कडक भूमिका केवळ दिखाऊ ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे.

लोणीकाळभोर व कदमवाकवस्ती परिसरात आज कोणत्याही पान टपरीवर सहजपणे गुटखा मिळत असल्याची वस्तुस्थिती नागरिकांनी मांडली आहे.

परिसरातील अनेक टपऱ्यांवर गुटखा व पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू आहे. कायद्याने स्पष्ट बंदी असतानाही हे पदार्थ उघडपणे विकले जात असल्याने “बंदी” ही केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाची नजर याकडे का जात नाही, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. स्थानिक नागरिक संतप्त होत म्हणतात, “अवैध धंदे बंद असल्याचे सांगितले जाते ; मात्र प्रत्यक्षात सर्व काही सुरळीत सुरू आहे. कारवाई फक्त दाखवण्यासाठीच होते का?” या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे, बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात परिसरात पोहोचतो तरी कसा? त्याचा पुरवठा नेमका कोण करत आहे? टपऱ्यांपर्यंत हा माल कोणाच्या माध्यमातून पोहोचतो? आणि यामागे कोणाचा “वरदहस्त” आहे का? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांनी परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली आहे. नागरिकांच्या मते, “जर प्रशासन खरोखरच कडक कारवाई करत असेल, तर उघडपणे चालणारे हे धंदे त्वरित बंद झाले असते. मात्र तसे होत नसल्याने कुठेतरी साखळी पातळीवर संगनमत असल्याचा संशय बळावतो आहे.” दरम्यान, पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन केवळ किरकोळ कारवाई न करता पुरवठा साखळीवर घाव घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा बंदीच्या नावाखाली सुरू असलेला हा “खुला खेळ” नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणार असून, प्रशासनावरील विश्वास आणखी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत अहवाल मागवण्यात येणार का? बंदी असलेल्या पदार्थांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार का?,” असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलेले आहेत.

उपायुक्त सागर कवडे यांची प्रतिक्रिया : “लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात गुटखा व पान मसाल्याची विक्री सुरू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे. असे प्रतिक्रिया घेताना विचारला असता या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आपल्याला कळवतो अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त सागर कवडे यांनी फोन वरुन दिली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??