जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे बीज रोवणारा कार्यक्रम माळीणमध्ये, शैलेंद्र बेल्हेकर यांचे मार्गदर्शन…

माळीणमध्ये युवा राष्ट्रनिर्माणाचा संदेश; शैक्षणिक संकल्पनांवर शैलेंद्र बेल्हेकर यांचा प्रभावी संवाद...

पुणे : अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा केला तोही आंबेगाव तालुक्यात जावून या धाडसी उपक्रमाने शैलेंद्र बेल्हेकर यांचे परिसरात कौतुक करावे तेवढे थोडे…

आदिवासी आणि डोंगरी भागातील मुलांना शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या सुविधा अजुनही मिळत नाही. याच गोष्टीची सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदतीचा हात देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व्यक्तीमत्व विकासाचे व्यासपीठ निर्माण करावे. असे अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी यावेळी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालयात मांजरी बुद्रुक येथील अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शैलेंद्र बेल्हेकर बोलत होते. संस्थेच्या वतीने विद्यालयातील सर्व मुलामुलींना वह्या पेन, छत्र्या व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी माळीण गावचे सरपंच रघुनाथ झांजरे, दादासाहेब उंद्रे, शंकर बावकर, गोरख आडेकर, माळीण ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी लेंभे, प्रमिला लेंभे, भामाबाई झांजरे, शाळेचे मुख्याध्यापक आर.ए.लोखंडे, उपशिक्षिका एस. डी.वेरूळकर, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रोहिदास लेंभे आदी मान्यवर उपस्थित होते.

शैलेंद्र बेल्हेकर पुढे म्हणाले माळीण गाव भुत्खलनात डोंगर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते १५१ गावकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता हा भीषण घटनेला आता ११ वर्षे पुर्ण होत आहेत. पण आज हा गाव मोठ्या धैर्याने / धाडसाने उभा राहिले आहे. या भागातील शाळेत शिकत असणाऱ्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन गावाच्या बाहेर शिक्षणासाठी इतर ठिकाणी जावून स्वतःच्या पायावर उभे राहून उच्च अधिकारी, नोकरी करावी अशी त्यांच्या पालकांची अपेक्षा आहे.‌ प्रत्येक्षात मात्र अशा आदिवासी डोंगरी भागातील शाळेत शिक्षक संख्या एक अथवा दोन असते विविध विषयांना शिक्षकच नाही एकाच शिक्षकाने अनेक विषय शिकवायचे ही परिस्थिती आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या मुलांना शिकविले पाहिजे. असे अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी सांगितले.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??