
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या मतदानानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून, त्याआधीच एक महत्त्वाचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, एनडीए आघाडी पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जेवीसी ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार,
एनडीएला १२० ते १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला ९३ ते ११२ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
भाजपाला ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८, एलजेपीला ५ ते ७, हमला २, आणि आरएलएमला २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
महाआघाडीत आरजेडीला ६९ ते ७८, काँग्रेसला ९ ते १७, आणि सीपीआय (एमएल) ला १२ ते १४ जागा मिळू शकतात.
तसेच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला सर्व्हेत केवळ एकाच जागेवर विजय मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एआयएमआयएम, बसपा आणि इतर लहान पक्षांना एकत्रितपणे ८ ते १० जागा मिळू शकतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.
मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत,
एनडीएला ४१-४३%,
महाआघाडीला ३९-४१%,
तर जनसुराजला ६-७% मते मिळू शकतात,
असं या सर्व्हेत नमूद आहे.
बिहार विधानसभेतील एकूण २४३ जागांपैकी बहुमताचा आकडा १२२ आहे.
मागील निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते. तेव्हा आरजेडीने ७५, भाजपाने ७४, जेडीयूने ४३, काँग्रेसने १९, एलजेपीने १, आणि इतरांनी ३१ जागा जिंकल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत मात्र जनसुराज पक्षाच्या एंट्रीमुळे तिरंगी लढत रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे. बिहारच्या राजकारणात कोण बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Editer sunil thorat



