जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“जैन युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज”— परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी “पुणे सकल जैन समाज मेळावा” अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यास दीड हजारांहून अधिक जैन अनुयायांनी हजेरी लावून ऐतिहासिक एकतेचा संदेश दिला.

हा मेळावा उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ यांच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्यात जैन समाजातील विविध संघटना, ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजाच्या राजकीय सहभागाची दिशा, एकजूट आणि आगामी निवडणुकांमधील प्रभावी सहभाग या विषयांवर सखोल चर्चा झाली.

“पक्ष नाही, समाज मोठा” — आयोजकांचे मत

“जैन समाजाची संघटित शक्ती आणि युवकांचा सक्रिय राजकीय सहभाग हे समाजाच्या सशक्त भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. धर्मापेक्षा पक्ष मोठा नाही, तर समाज मोठा आहे. जास्तीत जास्त जैन उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असे मत आयोजक अनिल नहार (अध्यक्ष, आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्ट), संदीप भंडारी (राष्ट्रीय महामंत्री, जैन अल्पसंख्यांक महासंघ) आणि महेंद्र सुंदेचा मुथ्था (प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष) यांनी व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन…

कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा, विजय भंडारी, अभय छाजेड, अनिल नहार, इंदर छाजेड, सुनील लोढा, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब ओसवाल, प्रविण चोरबोले, राजेंद्र बाटीया, हरेश शहा, प्रशांत देसरडा आदी मान्यवरांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.

सर्वपक्षीय जैन इच्छुक उमेदवारांची घोषणा…

मेळाव्यात विविध राजकीय पक्षांतील जैन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली —

भाजप : महेंद्र सुंदेचा मुथ्था, प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, आनंद छाजेड, भरत भुरट, विपेश सोनीग्रा, अरविंद कोठारी, प्रतीक देसरडा, राजू बाफना, कुंतीलाल चोरडिया, श्रीमल बेदमुथा, प्रकाश बाफना, प्रीती पाटील
काँग्रेस : भरत सुराणा, आनंद बाफना, योगिता सुराणा, अरुण कटारिया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : निलेश शहा, प्रशांत गांधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : जया बोरा, सुवर्ण कोठारी
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : रिषभ नानावटी
मनसे : ऋषभ सिंगवी
अपक्ष : निखिल मुनोत, हर्षदा मुनोत

आयोजन समितीचे परिश्रम व सहकार्य…

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश बोरा, मयूर सरनोत, जिनेन्द्र कावेडिया, विनोद सोळंकी, अभिजीत शहा, सौरभ धोका, निमेश शहा, सागर लुनिया, ऋषिकेश शहा, संतोष बोरा, आनंद गादिया, पंकज बाफना यांनी परिश्रम घेतले.

संदीप भंडारी यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले, तर महेंद्र सुंदेचा मुथ्था यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले.

एकतेचा संदेश आणि राजकीय जागृतीचा नवा अध्याय…

मेळाव्याचे संपूर्ण वातावरण जैन समाजाच्या एकतेचा, संघटित शक्तीचा आणि आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व घडविण्याच्या दृढ निर्धाराचा साक्षीदार ठरले.
“जैन युवकांनी एकत्र येऊन समाजहितासाठी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा — हीच काळाची गरज आहे,” असा प्रभावी संदेश परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांनी दिला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??