प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार…
शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याबद्दल गौरव...

संपादक श्री सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांना पुणे येथे आयोजित विशेष समारंभात भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन.एस.डी.सी.), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (एन.सी.व्ही.ई.टी.) आणि कौशल्य भारत यांच्या संयुक्त विद्यमाने प्लस नाईन वन मीडियाचे संस्थापक आणि सीईओ संदीप गुलाटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्राचार्य घोरपडे यांनी उच्च शिक्षणात राबवलेल्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, समाजाभिमुख कार्य आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा मनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. घोरपडे यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले आहे.
प्राचार्य घोरपडे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. तसेच त्यांच्या नावावर पेटेंट देखील आहेत. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला नॅककडून ‘अ पल्स’ दर्जा मिळाला आहे.
या पुरस्काराबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व ए. एम.जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.



