डिजीटल अटकेची भिती दाखवणारी टोळी गजाआड, अनधिकृत कॉल सेंटरवर छापा ; सायबर व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई… सविस्तर बातमी वाचा…

संपादक सुनिल थोरात
पुणे (खराडी) : पुणे येथील प्राईड आयकॉन खराडी मुंढवा रोड ०९ व्या मजल्यावर मैग्नेटेल बीपीएस अँड कन्सल्टंस एलएलपी हे अनाधिकृत कॉल सेंटरवर पुणे सायबर सेलने छापा टाकून पाच जण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण १३,७४,०००/- रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना त्यांच्या खात्याचा गैरवापर झाला असुन त्यातुन ड्रग्जची तस्करी झाल्याचे सांगुन त्यांना अॅमेझॉन डिजीटल अटकेची भिती दाखवुन त्यांची फसवणुक करण्याकरीता बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या पुर्व परवानगीने सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर व गुन्हे शाखा, पुणे कडील पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी तात्काळ मध्यरात्री छापा टाकला हे कॉल सेंटर विनापरवाना चालवत असुन तेथे अनधिकृत कॉल सेंटर चालु असल्याचे निदर्शनास आले.
त्या ठिकाणी १) सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. झुंझुना, राजस्थान २) अभिषेक अजयकुमार पांडे, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात ३) श्रीमय परेश शहा, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात, ४) लक्ष्मण अमरसिंग शेखावत, सध्या राखराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात, ५) अॅरोन अरुमन खिश्चन, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद गुजरात हे सायंकाळी ०६.०० वा ते पहाटे ०२.०० वा पर्यत अमेरिकन वेळेनुसार कॉल सेंटर चालवत असुन कॉल सेंटरमध्ये १११ पुरुष व १२ महिला कामकरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचेकडील लॅपटॉपची पाहणी केली असता तेथे संशयास्पद अॅप्लीकेशनचा, व्हिपीएन सॉफ्टवेअर चा वापर करुन कॉलर माईकव्दारे अमेरिकन नागरीकांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्ककरुन अॅमेझॉन अकाउंटचा बेकायदेशिर वापर होत असुन त्यामधुन ड्रग तस्करी केली जात असुन तेथील नागरिकांना डिजीटल अरेस्टची मिती दाखवुन त्यांना गिफ्ट कार्ड विकत घेण्यास भाग पाडुन ते गिफ्ट कार्ड स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. याकरीता त्यांचेकडे अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा लाखोंच्या सख्येतील डेटा लॅपटॉपमध्ये सापडला.
अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ९,६०,०००/- रु किं. एकुण ६४ लॅपटॉप, ४,१०,०००/- रु किंएकुण ४१ मोबाईल फोन, तसेच ४००० रु किं एकुण ०४ राउटर, कॉल सेंटरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची ओळखपत्र तसेच अमेरिकन नागरीकांना फसवणुक करण्यासाठी कर्मचा-यांना दिलेली इंग्रजीमधील संवादाची स्क्रिप्टची कागदपत्रे, इ. असा एकुण १३,७४,०००/- रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पुण्यातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी हे कॉल सेंटर आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनेक लोकांची चौकशी सुरू आहे. तर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे रॅकेट अमेरिकेतील लोकांना फसवायचे अशी माहिती समोर आली आहे. सायबरचा मोठा फ्रॉड होत होता अशी माहिती समोर आली आहे. या छाप्यात ४१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे.
अमेरिकेमधील लोकांना फसवून डिजिटल अटक करण्याच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे अशी माहिती समोर आली आहे.
सायबर पोलीसांनी ६१ लॅपटॉप जप्त केले आहेत. शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे. सर्व गुजरातचे असून मुख्य आरोपी देखील गुजरातचा असल्याची माहिती आहे. खराडीतील गुजरातच्या लोकांचा कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उध्वस्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



