सामाजिक
दोन कामगारासह पोकलेन नदीच्या कडेला प्रवाहामध्ये अडकले…जांब…

प्रतिनीधी डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : जांब गावात नीरा नदीवरील बंधाऱ्याचे काम करण्यासाठी पोकलेन घेऊन आलेले दोन कामगार पोकलेन सह नदीच्या कडेला प्रवाहामध्ये अडकलेले होते.
सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे, Api नागनाथ पाटील, Psi रतिलाल चौधर, Psi विजय टेळकीकर साहेब, Pc अमोल चितकोटे, पोलीस पाटील जांब उपस्थित होते.
सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी परिस्थितीचे गंभीर्य ओळखून गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर ग्राम सुरक्षा दलाची मुले यांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले असून सुरक्षित पाण्याच्या प्रवाहांमधून बाहेर काढलेले आहेत.





