
संपादक सुनिल थोरात
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी रात्री तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपूरला दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचे केले स्वागत
महाराष्ट्र भाजपच्या निवेदनानुसार, २६ मे रोजी ते जामठा येथील नागपूर कर्करोग संस्थेत एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि चिंचोली गावात राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या उपकेंद्राची पायाभरणी करतील.
नागपूर कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर, शहा नांदेडला जातील. येथेही ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. यानंतर ते रात्री मुंबईला रवाना होईल.
२७ मे रोजी, शाह मुंबईतील श्री नारायण मंदिर माधवबाग आणि सर कोवासजी जहांगीर हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर महाराष्ट्रातील हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला पोहोचले आहेत. रविवारी रात्री ९ वाजता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंग चहल, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, ए. आशिष देशमुख, ए. चरण सिंग ठाकूर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांचे स्वागत केले.
आज सोमवार, २६ मे रोजी शहा यांच्या उपस्थितीत नागपुरात महत्त्वाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अमित शहा येथे दोन प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. सकाळी ११ वाजता, ते जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत रुग्णांच्या राहण्यासाठी बांधलेल्या स्वस्ती निवास पंथघरची पायाभरणी करतील.
दुपारी १ वाजता कामठी तालुक्यातील चिंचोली येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (एनएफएसयू) कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी करतील. या तात्पुरत्या कॅम्पसचे आभासी उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील.



