जिल्हासामाजिक

परिमंडळ ५ मधील पोलीस ठाणेंना नवीन वाहनांचे वितरण…पहा व्हिडिओ…

संपादक सुनिल थोरात

पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात सद्यस्थितीत ५१४ चारचाकी आणि ४४५ दुचाकी अशी एकूण ९५९ शासकीय पोलीस वाहने कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३९ पोलीस स्टेशन कार्यरत असुन, या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ३९ सी आर मोबाईल व १२३ बीट मार्शल वाहने २४ x ७ पुणे शहर हद्दीत गस्त घालत असतात. त्यामुळे शहरात शांतता व सुरक्षीतता, सुव्यवस्था राखण्यास मदत होते. या व्यतिरिक्त पुणे शहर पोलीस दलात वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, विशेष शाखा, सीआयडी, एटीएस, एसीपी, क्युआरटी, बीडीएस, आर्थिक गुन्हे शाखा, एस.पी.यू. असे विविध विभागही शहराच्या सेवेत २४ x ७ तत्पर आहेत.

एकंदीत नव्याने निर्माण झालेली ०७ नवीन पोलीस स्टेशन व वेगाने वाढणारे आणि विकसित होणारे पुणे शहर तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपानुसार, पोलिसांच्या कामाचे स्वरूपही अधिकाधिक आव्हानात्मक व व्यापक बनले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणे, विविध व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींना एस्कॉर्ट व पायलट सेवा पुरवणे, पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभावीपणे पेट्रोलिंग करणे, बीट मार्शलिंग करणे, विविध गुन्हेगारांना न्यायालयात ने-आण करणे, तसेच गुन्ह्यांच्या तपासाकरिता जिल्ह्यांतर्गत, जिल्हाबाहेर आणि इतर राज्यांमध्ये जाणे-येणे, यांसारख्या विविध कामांसाठी पोलीस दलाला सातत्याने सुसज्ज आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता असते. मोटर परिवहन विभागामार्फतच या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात.

यापूर्वी, आपल्याकडील जवळपास ६७० पोलीस वाहनांचे निकामीकरण करून त्यांचा लिलाव करण्यात आला होता. यामुळे, तसेच पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे, पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर वाहनांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे.

पुणे शहरातील सिटी कार्पोरेशन लि. (अमनोरा) यांनी त्यांच्या सी.एस.आर फंडामधून पुणे शहर पोलीस दलास एकूण ९ चारचाकी वाहने रितसर खरेदी प्रक्रिया राबवून प्रदान केली आहेत. यामुळे निश्चितच पोलीस पेट्रोलिंग आणखी वाढविण्याकरीता त्यांचा उपयोग पुणे शहर पोलीस दलास होणार आहे.

आज रोजी दिनांक २८/०५/२०२५ रोजी सिटी कार्पोरेशन लि.चे (अमनोरा) व्यवस्थापकीय संचालक अनिरुध्द देशपांडे यांनी अधिकृत कार्यक्रमाव्दारे सदरची एकूण ९ चारचाकी वाहने पुणे शहराचे पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचेकडे सुपूर्त केली आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??