बनावट वकील महिलेने उकळली ५ लाख ९४ हजारांची खंडणी, लोणी काळभोर पोलीसांनी खंडणी स्विकारणारे महिलेस सापळा रचुन रंगेहात पकडले…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : दिनांक २४/०४/२०२५ रोजीपासुन ते दिनांक २८/०५/२०२५ रोजीचे दरम्यान मौजे लोणी काळभोर येथे राहणेस असलेली महिला नामे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे वय ३२ वर्षे रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे या महिलेने इसम नामे कडु बाबुराव सातपुते वय. ६३ वर्षे धंदा. शेती रा. दहिगाव माळी गल्ली, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे अशिक्षित व अडाणीपणचा गैरफायदा घेवून त्यांना वकील असल्याचे खोटे सांगुण त्यांची दिशाभुल केली. तसेच स्नेहल हरिश्चंद्र कांबळे या महिलेने कडु बाबुराव सातपुते यांना कोर्टात त्यांचे सुनेपासुन सोडचिठ्ठी घेवून देणेचे अमिष दाखवुन त्यांचेकडुन वेळोवेळी रोख व बँक खात्यावर पैसे घेवुन, सोडचिड्डी करुन न देता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. त्याचप्रमाणे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे या महिलेने कडु बाबुराव सातपुते यांना त्यांचेविरुध्द त्यांचे सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच तीने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे खोटे कारणे सांगुन त्यातुन सोडवुन देणेकरीता पोलीस व कोर्ट कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील नाहितर त्यांना अटक होईल वगैरे खोटी माहिती देवुन त्यांना वेळोवेळी अटकेची भिती घालुन त्यांचेकडुन आजपावेतो वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरुपात एकुण ५.९४,०६०/- रुपये खंडणी स्वरुपात स्विकारले आहेत.
सदर घटनेसंदर्भात इसम नाव कडु बाबुराव सातपुते यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे यांची समक्ष भेट घेवुन त्यांना हकिकत सांगितली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार यांचे अधिपत्त्याखाली एका स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना तक्रारदार हे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे यांना खंडणीची रक्कम देताना सापळा रचुन रंगेहात पकडणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार यांनी पोलीस हवालदार ७९०५, ज्योती नवले, पो. शि. ८१०८ मंगेश नानापुरे, पोलीस शिपाई ३८५० धुमाळ व दोन महिला पंचांचे मदतिने वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्नेहल हरिश्चंद्र कांबळे हिचे लोणी काळभोर गावातील ऑफिसचे ठिकाणी सापळा रचुन तीला तक्रारदार यांचेकडुन १५०००/- रुपये रोख रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. सदर रक्कम स्विकारतानाचा तसेच पैसे मोजुन आणखी पैशांची मागणी करतानाचे व्हिडीओशुटींग करुन पोलीसांनी यशस्वीरित्या सापळा कारवाई करुन, तक्रारदार यांनी खंडणी स्वरुपात दिलेले १५०००/- रुपये पंचांसमक्ष जप्त केले आहेत.
सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस २३२/२०२५, भा.न्या.सं.क. ३०८(२) (३). ३१८(४). ३१९(१) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सदर गुन्हयात नमुद महिला आरोपीस दि. २८/०५/२०२५ रोजी अटक करणेत आली आहे. त्याचप्रमाणे सदर महिलेची पोलीसांनी घरझडती असता तीचे राहतेघरी अनेक गुन्हयांच्या एफ. आय. आर. कॉपी, तक्रारी अर्ज, प्रॉपर्टीचे पेपर्स व काही संशयीत दस्त मिळुन आले आहेत. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदर महिलेने अशाचप्रकारे वकील असल्याचे सांगुन अनेक नागरीकांची फसवणुक केली असल्याची माहिती प्राप्त होत असुन त्याअनुषंगाने नागरीकांना आवाहन करण्यात येते की, महिला नामे नामे स्नेहल कांबळे रा. लोणी काळभोर, पुणे हीने ज्यांची अशाप्रकारे फसवणुक केली आहे त्यांनी लोणी काळभोर पोलीसांशी संपर्क साधावा.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे व मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पोलीस हवालदार ७९०५, ज्योती नवले, पो. शि. ८१०८ मंगेश नानापुरे, पोलीस शिपाई ३८५० धुमाळ, पो. शि. जोजारे, पो. हवा. कुंभार यांनी केली आहे.



