
पुणे : ईस्टर्न मिडोज, खराडी येथील रहिवाशांमध्ये एकतेचा आणि खेळाडूवृत्तीचा सुंदर संदेश देणारी व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्ल्यांची नावे घेऊन तयार करण्यात आलेल्या सहा संघांनी या स्पर्धेत भाग घेतला.
सहा संघांची नावे – तोरणा, पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड आणि सिंहगड.
सर्व संघांनी आपापली कौशल्यं, एकजूट आणि चिवट प्रयत्न दाखवून सामने अधिकच रंगतदार बनवले. अखेरच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात तोरणा संघाने उत्कृष्ट खेळ करून विजेतेपद मिळवले आणि आपले नाव यशस्वीपणे कोरले.
खालील प्रमाणे विजेता संघ🥇 तोरणा – विजेता संघ, 🥈 रायगड – उपविजेता संघ, 🥉 पन्हाळा – तिसरे स्थान मिळवले.
या स्पर्धेतील खेळाडूंनी केवळ खेळात नव्हे, तर सहकार्य, मैत्री आणि कुटुंबवत्सल भावना या मूल्यांचाही आदर्श घालून दिला. या सुंदर आयोजनामध्ये स्पर्धेच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व स्वयंसेवक व आयोजकांचे विशेष आभार. मैदानाची योग्य तयारी, बॉल्स व नेट्सची व्यवस्था, वेळेचे उत्तम नियोजन यामुळे संपूर्ण स्पर्धा अत्यंत सुव्यवस्थित आणि यशस्वी झाली. MNGL गॅस पाईपलाईन, सोलर लाईट व रेन हार्वेस्टिंग असे विविध सोसायटीच्या हितासाठी योजना राबवण्यात आली याचप्रमाणे सांघिक खेळाच्या स्पर्धा भविष्यातही अशाच उत्साहात आणि एकतेने पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
मुख्य संपादक सुनिल थोरात



