देश विदेश

भारतात एकूण किती क्रिकेट स्टेडिअम आहेत ? तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई : भारतातील सगळ्यात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. आणि पावसाळ्यातील ४ महिने सोडले तर उर्वरित ८ महिन्यांत देशभर क्रिकेटचाच माहौल देशभर असतो. सप्टेंबरमध्ये पावसाळा सुरू होतो.

उन्हाळ्याचा हंगाम असतो तो देशांतर्गत स्पर्धांचा. भारतीय क्रिकेट संघ हा जगभरातील सगळ्यात व्यस्त क्रिकेट संघ आहे. क्रिकेटच्या या लोकप्रियतेमुळेच स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात क्रिकेटला आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली आहे.

१९२६ साली तेव्हाच्या मद्रास (आता चेन्नई) बीसीसीआयची (BCCI) स्थापना झाली. आणि लगेचच दोन वर्षांत बीसीसीआय आयसीसीच्या छत्राखाली आलं. आयसीसी (ICC) तेव्हा इंम्पेरिअल क्रिकेट काऊन्सिल म्हणून प्रसिद्ध होती. अगदी सुरुवातीपासून देशात क्रिकेटसाठी सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी बीसीसीआयचीच आहे. स्वातंत्र्यानंतर बीसीसीआय (BCCI) संघटना विविध राज्य संघटना आणि त्यांच्या अंतर्गत येणारे क्लब यांची बनलेली आहे.

जवळ जवळ प्रत्येक राज्य संघटनेचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडिअम आहे. आणि क्लब पातळीवरही स्थानिक सामने होऊ शकतील अशी मैदानं आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला तर देशात या घडीला एकूण ५० आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन झालेली क्रिकेट मैदानं आहेत. पण, काळाच्या ओघात काही बंदही झाली आहेत. त्यामुळे सध्या यातील ३० केंद्रावरच आंतरराष्ट्रीय सामने होतात.

१९३३ साली भारतात पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी मुंबईच्या जिमखाना मैदानावर खेळवण्यात आली होती. तिथली आसन क्षमताही १५,००० इतकी घसघशीत होती. पण, हे मैदानही आता बंद झालं आहे. त्यानंतर १९३७ साली मुंबईतच फक्त क्रिकेटला वाहिलेलं स्टेडिअम उभं राहिलं. त्याचं नाव ब्रेबॉर्न स्टेडिअम क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं हे स्टेडिअम अनेक आंतरराष्ट्रीय सामन्याचं साक्षीदार आहे.

देशातील सगळ्यात जुनं क्रिकेट स्टेडिअम आहे ते कोलकात्यातील ईडन गार्डन्स १९३४ साली बंगाल क्रिकेट असोसिएशनने हे स्टेडिअम बांधलं. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता ८०,००० ची आहे. आणि देशात सर्वाधिक म्हणजे ४२ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने याच मैदानावर झाले आहेत. त्यानंतर एका महिन्यातच चेन्नईत चिदंबरम स्टेडिअमचं ही उद्घाटन झालं. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही दोनच क्रिकेट स्टेडिअम देशात अस्तित्वात होती. पुढे दिल्ली, मुंबई आणि कानपूरमध्ये स्टेडिअम उभी राहिली. आता ३० राज्यांमध्ये स्टेडिअम उभी आहेत.

यातील अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम हे आकाराने सगळ्यात मोठं आहे. आणि इथे एकाच वेळी १,२०,००० लोक सामन्याचा आनंद लुटू शकतात. तर हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला इथं असलेलं स्टेडिअम ह जगातील सगळ्यात उंचीवर असलेलं स्टेडिअम आहे.

मुख्य संपादक सुनिल थोरात

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??