शिक्षण
परिक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत ; निमगाव केतकी

पुणे (इंदापूर) : निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.
यावेळी सतीश हेगडे, प्राचार्य एम. बी. भोंग, डी. डी. रोटे, आर. एम. अर्जुन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सी. व्ही. मोरे, बी. व्ही. नाझरकर, बी. एन. बांदल, एच. व्ही. सूळ, डी. डी. मिसाळ, के. डी. वायाळ, एस. ए. घरत, ए. टी. निंबाळकर, के. एस. आत्तार, ए. आर. जामदार उपस्थित होते.
या परिक्षा केंद्रावर कळस येथील हरणेश्वर विद्यालय आणि निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयाचे २५९ विद्यार्थी परिक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त, परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय केली आहे. याशिवाय बैठे पथक स्थापन केले आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टीने आरोग्य सेविकांची नेमणूक या केंद्रावर केल्याचे केंद्र संचालक एम. बी. भोंग यांनी सांगितले.



