जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शेवाळेवाडी येथे पेट्रोल-डिझेल टँकरला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाचे वेळेवर नियंत्रण ; मोठी दुर्घटना टळली

शेवाळेवाडी (हडपसर) : (दि. १० नोव्हेंबर २०२५) पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या हडपसर केंद्राने वेळीच दाखविलेल्या तत्परतेमुळे आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास एक २०,००० लिटर क्षमतेचा टँकर (क्रमांक MH14 EM7540) अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. टँकरमध्ये ५,००० लिटर पेट्रोल आणि १५,००० लिटर डिझेल भरलेले होते.

वाहतूक नियंत्रणात पोलिसांचा मोलाचा वाटा…

टँकरला आग लागल्याची माहिती मिळताच वाहतूक निरीक्षक राजेंद्र करणकोट, विकास जगदाळे मेजर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक पूर्णपणे नियंत्रणात ठेवून पेट घेतलेले वाहन बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. त्यांच्या समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न…

अग्निशमन केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, प्रभारी अधिकारी निलेश लोणकर, तांत्रिक अधिकारी शौकत शेख, ड्रायव्हर नारायण जगताप, लोखंडे, शेख, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड, अविनाश ढाकणे, हर्षद पवार, गावडे, तांबे, साळवे, नवले, शिंदे आदींनी आग विझवण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे टँकरचा स्फोट होण्यापासून बचाव झाला. नागरिकांनी या शूर दलाचे कौतुक करत ‘करावे तेवढे थोडेच’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

घटनेचा तपशील…

टँकर चालक शंकर तानाजी देशमुख यांनी सांगितले की, “मी टँकर सोलापूर साईट कडुन भरून तळेगाव दाभाडे कडे चाललो होतो. गाडीच्या क्लच बेल्टमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गाडी थांबवली. आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण ती नियंत्रणाबाहेर गेली.”

HP अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि शंका…

घटनेची माहिती मिळताच HP कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत तेथून पलायन केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. टँकरकडे आवश्यक कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र किंवा ज्वलनशील पदार्थ वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी नव्हती, का? अशी चर्चा स्थानिक नागरिक आपापसात चर्चा करताना माहिती समोर आली आहे.

मोठी दुर्घटना टळली…

अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आणि पोलिसांच्या योग्य वाहतूक नियोजनामुळे मोठा स्फोट आणि जीवितहानी टळली. परिसरातील नागरिक व व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला असून या घटनेची चौकशी सुरू आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??