पुणे : आषाढी एकादशी जवळ आल्याने आता वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत. यंदाचा वारी सोहळा १८ जूनला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १८ जून रोजी सुरु होईल आणि याच दिवशी तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करेल.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू होईल. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने शेतकरी आपली कामे आटोपून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीत जाण्याची तयारी करत आहेत.
या वारी सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या आणि पालख्या पंढरपुरच्या दिशेने रवाना होतात. या पालख्यांमध्ये हजारो वारकरी विठुनामाचा गजरात करत ऊन, पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी तल्लीन होतात. यंदा आषाढी एकादशी ६ जुलै २०२५ रोजी आहे. या दिवशी सर्व दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील. या वारी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी वेळापत्रक (२०२५) पुढीलप्रमाणे…
19 जूनः माऊली पालखी प्रस्थान आळंदी (संध्याकाळी ८ वाजता प्रस्थान)
20 जूनः आळंदी ते पुणे
21 जूनः पुणे मुक्काम
22 जूनः पुणे ते सासवड (दिवेघाट वारकरी खेळ)
23 जूनः सासवड मुक्काम
24 जूनः सासवड ते जेजुरी (भंडाऱ्याची उधळण)
25 जून: जेजुरी ते वाल्हे (जेजुरी खंडोबा दर्शन)
26 जून: वाल्हे ते लोणंद (माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
27 जूनः लोणंद ते तरडगाव
28 जूनः तरडगाव ते फलटण
29 जूनः फलटण ते बरड
30 जूनः बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
1 जुलैः नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
2 जुलैः माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
3 जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण व टप्पा येथे बंधू भेट)
4 जुलैः भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलैः वाखरी ते पंढरपूर (पौर्णिमेपर्यंत मुक्काम, वाखरी येथे गोल रिंगण)
6 जुलैः देवशयनी आषाढी एकादशी
10 जुलैः पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पायी वारी वेळापत्रक (२०२५) पुढीलप्रमाणे…
18 जूनः प्रस्थान, इनामदार वाडा मुक्काम
19 जून: देहू निगडी आकुर्डी प्रवास, आकुर्डी मुक्काम
20 जूनः आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 जूनः निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे मुक्काम
22 जूनः पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास, मुक्काम
23 जूनः लोणी काळभोर ते यवत प्रवास, मुक्काम
24 जूनः यवत वरवंड चौफुला प्रवास, मुक्काम
25 जूनः वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास, मुक्काम
26 जूनः उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास, मुक्काम
27 जून: बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम
(काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण)
28 जूनः सणसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास, मुक्काम (बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण)
29 जूनः निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
30 जूनः इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास, मुक्काम
1 जुलैः सराटी ते अकलूज प्रवास, मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलैः अकलूज ते बोरगाव प्रवास, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
3 जुलैः बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास, मुक्काम
4 जुलैः पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलैः वाखरी ते पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
6 जुलैः एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 जुलैः पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवास
मुख्य संपादक सुनिल थोरात
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा