पुणे : आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमीची पैलवान वैष्णवी अमोल तोरवे हिने हिमाचल, पंजाब, हरियाणा, बिहार, व अंतिम कुस्तीत दिल्लीच्या पैलवाना बरोबर १०-० अशा फरकाने विजय मिळवून भारत देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी महिला पैलवान वैष्णवी अमोल तोरवे हिची निवड झाली आहे.
इंदापूर तालुक्याचे नाव लौकिक करणाऱ्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल तालुक्यातील नागरिकांचे कर्तव्य म्हणून, भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा यांच्या वतीने कुमारी पै. वैष्णवी अमोल तोरवे हिचा व तिचे वडील (गुरू) या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अमोल तोरवे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन आरडे, माऊली वाघमोडे, राजू जठार, राम असबे, सुयोग सावंत, सचिन सावंत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक डॉ गजानन टिंगरे
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा