आरोग्यजिल्हासामाजिक

विश्वराज हॉस्पीटलमध्ये पुण्यातील प्रथमच ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ शस्त्रक्रिया यशस्वी ; योगेश बाळू शिंदे याला मिळाले नवजीवन…

पुणे (हवेली) : बारामती येथील १८ वर्षीय योगेश शिंदेला लहानपणापासून थोडे चालल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत होता. तो इतर मुलांसारखा खेळू शकत नव्हता. घरातील लोक चिंतेत होते. हळू हळू त्याचा आजार वाढत चालला होता. जेव्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली, तेव्हा डॉक्टरांकडून यांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर लाखो रुपये लागतील अशी माहिती मिळाली.

परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कुटुंबीय हा खर्च ते करू शकत नव्हते. परंतू लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलने ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विनाचिरफाड करता निःशुल्क शस्त्रक्रिया केली. त्यामुळे योगेश बाळू शिंदे याला मिळाले नवजीवन मिळाले. आहे. १० हजार बालकांमध्ये एखादयालाच असणार्‍या हृदयाच्या आजाराला दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. योगेश शिंदे याला त्यापैकीच एक आहे. त्याच्यावर पारंपरिक पद्धतीऐवजी आम्ही एका अत्याधुनिक व कमी धोकादायक प्रक्रियेचा अवलंब करून फॉन्टन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्णपणे ट्रान्सकॅथेटर मार्गाने यशस्वी केला. त्यामुळे उघड्या छातीची शस्त्रक्रिया टाळता आली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांचा डिस्चार्जचा कालावधी लागतो. परंतू आम्ही रुग्ण केवळ तीन दिवसांतच डिस्चार्ज दिला. अशी माहिती लोणी-काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिषकुमार बनपुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कातकडे, वैद्यकीय संचालक डॉ. सुजितकुमार एम., कार्डिओलॉजिस्ट डॉ. सूरज इंगोले, बालरोग विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत सहारे, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विजय खंडाळे, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शेंडगे हे उपस्थित होते.
डॉ. बनपुरकर म्हणाले, ही एक अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, मात्र आम्ही कॅथेटर-आधारित तंत्र वापरून रुग्णाचा धोका, शारीरिक आघात आणि रिकव्हरीचा कालावधी फारच कमी केला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९६% पर्यंत वाढले आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसून आली.
डॉ. सुजितकुमार एम. म्हणाले, योगेश बाळू शिंदे (वय १८) हा नुकत्याच पार पडलेल्या फलटण येथील एका वैद्यकीय शिबिरात उपस्थित राहिला, तेव्हा त्याला तीव्र दम लागणे आणि केवळ ७०% ऑक्सिजन सॅच्युरेशन अशी स्थिती होती. त्याच्या हृदयात ट्रायकसपिड अ‍ॅट्रेशिया, डबल आउटलेट राईट व्हेंट्रिकल (DORV), व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) आणि पल्मोनरी स्टेनोसिस (PS) अशा अनेक जन्मजात दोषांची चिकित्सा झाली होती. २०१८ मध्ये मुंबई येथे बायडायरेक्शनल ग्लेन शंट व फॉन्टन प्रिपरेशन शस्त्रक्रिया करून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता.
पेशंटची आई सुनीता शिंदे म्हणाल्या, २०१८ साली आर्थिक मदतीच्या जोरावर पहिली शस्त्रक्रिया झाली, आणि नुकत्याच एका वैद्यकीय शिबिरात विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी झालेल्या भेटीनंतर दुसरी टप्प्यातील शस्त्रक्रिया एका नव्या आणि कमी जोखमीच्या पद्धतीने मोफत करण्यात आली. त्यामुळे माझ्या मुलाला नवीन जीवन जगण्याची उमेद मिळाली. यासाठी मी विश्वराज हॉस्पीटल व डॉक्टरांचे आभार मानते.
ही शस्त्रक्रिया योजने NGO अंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही अत्याधुनिक उपचार घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, हॉस्पिटलने आतापर्यंत सुमारे ५० बालहृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. या यशामुळे भविष्यात अधिक रूग्णांसाठी ट्रान्सकॅथेटर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??