
पुणे (हडपसर) : गुरुचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन आपल्या गुरुला वंदन करावे आणि त्याला आदर्श ठेवून आपले मार्गक्रमण करावे हा पाठ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडून, निसर्गाकडून शिकत मार्गक्रमण करावे व विकसित व्हावे असे सांगितले. महाविद्यालयाचे आयक्यूएसी कोऑर्डीनेटर डॉ. लतेश निकम यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि गुरु पेक्षाही मोठे होण्याचा प्रयत्न करा असा आशीर्वाद दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. यासाठी नाना शिंदे, विद्यार्थी चैतन्य देशपांडे, संस्कार पवार, ओम लटके या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सविता कुलकर्णी, जिल्हा समन्वयक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्राचार्य नितीन घोरपडे, सदस्य व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात





