सामाजिक

“खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे ; विजय ननवरे…

पुणे (हवेली) : “खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !” असे प्रतिपादन विश्वरत्न फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ननवरे यांनी केले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून लक्ष्मी कॉलनी येथे विश्वरत्न फाउंडेशन यांचे वतीने ज्ञानसागर प्राथमिक विद्यालय येथे गुरुपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपस्थित विश्वरत्न फाउंडेशनचे विश्वस्त भरत सारडा, तुळशीराम घुसाळकर, हेमंत ढवळे, विठ्ठल लांडगे, दिलीप गायकवाड, संजय लोंढे, मुख्याध्यापक प्रितम बर्गे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ननवरे पुढे म्हणाले की गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांंना पेन व आदर्श शिक्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याच समवेत गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूलबॅग व पेन देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल ताजणे यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार गुलचंद मुंढे यांनी मानले.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??