
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मास्टरजी कम्युनिटीचा ‘हॅपीनेस प्रोग्राम’ या परिवर्तनशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रसिद्ध गायक आणि परफॉर्मर गुरशिश सिंग, मुंबईतील सेलिब्रिटी लाईफ कोच वेदांतिका पुरी, क्वांटिटेटिव्ह फायनान्स तज्ज्ञ हेमा मंडविया सौरभ, यूएइमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील माजी फायनान्स विश्लेषक दीपा नायर, भारत आणि दुबईतील शाळांमध्ये अनुभवी शिक्षिका रेणुका भास्कर यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते.
हॅपीनेस प्रोग्राम हा शाश्वत आणि सोप्या शिकवणींवर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सर्व वयोगटांतील आणि विविध पार्श्वभूमीतील लोकांसाठी डिझाइन केलेला आहे, ज्याचा उद्देश त्यांना अधिक जागरूक, स्पष्ट आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करणे हा आहे. असे वेदांतिका पुरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक त्याचप्रमाणे व्यावसायिक खऱ्या आयुष्यातील अनुभव, उपयुक्त ज्ञान आणि शांत, आनंददायक अनुभवांच्या माध्यमातून सहभागींच्या जीवनात सकारात्मक आणि प्रेरणादायी बदल घडवणे . ‘कारण आनंद ही केवळ एक भावना नाही, तो जगण्याचा मार्ग आहे,’ हे या कार्यक्रमाचे मूळ तत्वज्ञान असल्याचे रेणुका भास्कर सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मन आणि भावना समजून घेण्याची सोपी पण सखोल अंतर्दृष्टी. ताणतणाव, चिंता आणि अंतर्गत संघर्ष कमी करण्याचे प्रभावी उपाय. वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्याची क्षमता त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील वाघमोडे यांनी केले तर आभार डॉ, शुभांगी औटी यांनी मानले.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात




