पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात फिल्म कल्बमध्ये मराठी विभागाच्यावतीने ‘ना. धो महानोर : नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाची चित्रफीत विद्यार्थ्याना दाखविण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. जोशी म्हविद्यालातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. अतुल चौरे उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले.
सध्या लघुपटास चांगले दिवस आले असून लघुपट निर्मितीसाठी कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, आणि ध्वनी हे घटक महत्त्वाचे असतात. लघुपटासाठी कथानक,पटकथा तयार करण्याची संधी मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. असे मत डॉ. अतुल चौरे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी लघुपट निर्मातीसाठी अभ्यास संशोधन करावे लागते. एखादा विषय सहजपणे समजून सांगण्यासाठी लघुपट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ही चित्रफीत पाहिल्यावर विद्यार्थ्यांनी त्यावर चर्चा घडवून आणली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, प्रा.डॉ. नाना झगडे, डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. काशिनाथ दिवटे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. सूरज काळे आदी उपस्थित होते.
प्रा. काशिनाथ दिवटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. डॉ. नाना झगडे यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन यांनी केले तर आभार प्रा. सूरज काळे यांनी मानले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा