जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्काराचा सन्मान ; गाडी लोहार समाज उन्नती मंडळ, कल्याण यांची घोषणा…

सामाजिक कार्यात मोलाचे योगदान; बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार...

पुणे : गाडी लोहार समाज उन्नती मंडळ, कल्याण यांचे वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार या वर्षी पिंपरी चिंचवड येथील येथील सामाजिक कार्यकर्ते व लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांना नुकताच जाहीर करण्यात आला.

बाळासाहेब शेलार यांनी सन २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील लोहार समाजासाठी लोहार उत्सव समितीची स्थापना करून आपल्या समाज कार्याला सुरुवात केली. परंतु बाळासाहेब शेलार यांनी पिंपरी चिंचवड परिसरा बरोबर पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत समाजासाठी सातत्यांने समाज कार्य करत असतात.

समाजाचा सर्वांगीण विकास, या प्रेरणेतून प्रोत्साहित होऊन बाळासाहेब शेलार यांनी लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या स्थापने बरोबर समाजासाठी विविध उपक्रम सुरू केले. 

२०१७ सालापासून लोहार समाजासाठी असलेली तळमळ आणि त्या प्रेरणेतून आज रोजी संस्थेच्या अंतर्गत लोहार उत्सव समिती, उद्योग समिती, ऐतिहासिक सहल समिती, भक्ती शक्ती महिला मंडळ, विश्वकर्मा एंटरटेनमेंट, वधू वर पालक सहाय्यक या समितींच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती महोत्सव, घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा, उद्योजक, व्यावसायीक मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, कलाकार आपल्यातला, विविध उपक्रमांमध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा, हळदी कुंकू, महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

तसेच लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार असे पुरस्कार दिले जातात. या उपक्रमांमुळे लोहार समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्रातील एक नावाजलेली व लोहार समाजाच्या विकासासाठी निर्मिती झाली आहे. संस्थेचे माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर, पुणे ग्रामीण परिसरातील जवळपास चार हजार कुटुंबे एकत्र जोडली गेली आहेत.

लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांना या पुर्वी दोन वेळा समाज भूषण पुरस्कार व एका वेळी राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने बाळासाहेब शेलार त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सामाजिक कार्यातील असलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांची गाडी लोहार समाज उन्नती मंडळ राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार गाडी लोहार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने (दि.२१) जूलै रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवराच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??