
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भूगोल व पर्यटन विभागाच्यावतीने युनेस्कोने महाराष्ट्र राज्यातील ११ व तमिळनाडू मधील १ अशा १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समा जागतिक वारसा स्स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आल्याची घोषणा केल्याबद्दल विद्यार्थ्यांना पुरणपोळी भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तसेच मी किल्ला बोलतोय, चालत बोलता प्रश्नमंजुषा, किल्ले विषयक सामान्य ज्ञान स्पर्धा, किल्ले स्थळ दर्शक नकाशा स्पर्धा, खेळ नकाशाचा, खेळ प्रश्नाचा अशा विविध उपक्रम तसेच जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले, सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंतनू जगदाळे, अमर तुपे, अशोक बालगुडे, दिगंबर माने, स्नेहल कांबळे, संजय घुले, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, व्यवस्थापन या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात. इतिहासातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पन्हाळगडावर बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहचल्यावर प्राण सोडतात. प्राण कधी सोडायचे हे ठरविणारी घटना राज्यावरची निष्ठा प्रकट करते. प्रतापगडावरील खानाची भेट, वाघनखांचा वापर वापर यासारख्या घटना छत्रपतींची युद्धनीती आणि व्यवस्थापन यांचा दाखला देते. छत्रपतींनी जनतेच्या आकांशाचे आदर्श स्वराज्य निर्मिले ते स्वराज्य रयतेच्या मनामनात रुजले. छत्रपतीचा पराक्रमी इतिहास व गडकिल्ल्यांसारखे वैभव जगातील कोणत्याही देशाकडे नाही. हा वारसा आजच्या तरुण पिढीने जपले पाहिजेत असे प्रीतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश झालेल्या किल्ल्यांमध्ये शिवनेरी, राजगड आणि लोहगड या तीन किल्यांचा समावेश आहे. आपल्या इतिहासाची जगाने दखल घेतली आहे या घटनेचा आपल्याला अभिमान असून महाराष्ट्रातील सर्वच गडकिल्यांचे संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची आहे. असे आवाहन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे प्रत्येकाने यांनी वर्षातून एकदा तरीजागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांना भेट देऊन किल्यांचे पावित्र्य राखण्याचा संकल्पकरावा असे सांगितले.
या प्रसंगी या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, जयश्री अकोलकर, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. गणेश गांधीले, प्रा शीतल डांगमाळी, प्रा. प्रा. रेवती नेवसकर, प्रा. ज्योती धोत्रे, प्रा. अविनाश राठोड प्रा. नाझनीन मनेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. गणेश गांधीले यांनी मानले.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात






