कृषी व्यापारजिल्हाराजकीयसामाजिक

बिनविरोध निवडून हवेली बाजार समितीवर झेंडा रोवला, प्रकाश जगताप यांची सभापतीपदी निवड…

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड...

पुणे (हवेली) : आशिया खंडात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे च्या सभापतीपदी प्रकाश चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार (१८ जुलै) रोजी सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सभापती पदासाठी प्रकाश जगताप यांचा एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद व दौंडचे आमदार राहुल कुल या दोघांनी प्रमुख भूमिका बजावल्याचे समजत आहे.

यावेळी संचालक रोहिदास उंद्रे, रामकृष्ण सातव, राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, प्रशांत काळभोर, दिलीप काळभोर, नितीन दांगट, गणेश घुले, रवींद्र कंद, मनिषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे, गणेश घुले व अनिरुध्द भोसले, संतोष नांगरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

दिलीप काळभोर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यातून सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत हवेली तालुक्यात मोठी चर्चा सुरू होती. हे पद आपल्याच समर्थकाच्या पदरात पडावे म्हणून तालुक्यातील नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना साकडे घातले होते. परंतु संचालक मंडळातील विद्यमान १२ संचालकांनी प्रकाश जगताप यांना पाठबळ दिलेने त्यांचा सभापतीपदाचा मार्ग सुकर झाला.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर तब्बल २३ वर्षे प्रशासक होते. या जोखडातून मुक्त करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया व सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रादेशिक, पुणे जिल्हा रचना झाल्यानंतर हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकाश जगताप यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी दौंड चे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, विकास दांगट यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रवादी (अजित पवार ) गट, भाजप गट यांच्या सोबतीने या बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनेलची रचना करून सत्ता हस्तगत केली. परंतु त्यानंतर झालेल्या सभापतीपदाच्या बेबनावात पुढील सभापती हा सर्वपक्षीय नेते निवडीचा की भाजपचा म्हणून तालुक्यात चर्चेने जोर धरला होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी या निवड प्रक्रियेत जगताप यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे.

पुणे बाजार समिती तसेच यशवंत सहकारी साखर कारखाना या हवेलीतील दोन मोठ्या संस्थांच्या अध्यक्षपदी दोन सख्खे भाऊ काम पाहणार म्हणून बाजार समितीच्या निवड प्रक्रियेपुर्वीच विरोधकांकडून मोठा गदारोळ सुरू करण्यात आला होता. हवेली तालुक्यात दोन सख्खे भाऊ दोन महत्वाचा संस्थांवर कशासाठी? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु हा सर्व विरोध मोडीत काढून जगताप यांनी आपणच सहकारामधील शिरोमणी असल्याचे दाखवून दिले आहे.

पुणे बाजार समितीच्या माध्यमातून यशवंत कारखान्याची जमीन खरेदी करून तालुक्यातील सहकारी संस्थेला नवसंजीवनी देण्याचा पहिला प्रयत्न सभापती प्रकाश जगताप यांनी मांडला होता. या निर्णयाला बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने ठराव मंजूर करून पाठिंबा दिला आहे. राज्य शासनाकडून या जमिनविक्री प्रस्तावाला पणन विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

या प्रस्तावाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर नवनिर्वाचित सभापती प्रकाश जगताप निश्चित मार्ग काढतील. व यशवंत कारखान्याच्या जमीन खरेदीच्या प्रस्तावाला बळ देतील. अशी तालुक्यात चर्चा सुरु आहे.

पुणे बाजार समिती प्रमाणे हवेली तालुका खरेदी विक्री संघाची कायदेशीर निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून सभापती प्रकाश जगताप यांच्या समर्थकांनी जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीमुळे हवेली तालुक्यात ५० वर्षे न झालेली निवडणूक होण्याची कार्यवाही अटळ बनली आहे. बाजार समिती,यशवंत कारखान्याप्रमाणे खरेदी संघाच्या निवडणूकीचे राजकारण जगताप बंधूच्या ग्लॅमर भोवती फिरणार असल्याचे बोलले जाते.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??