क्राईम न्युजजिल्हा

फक्त २४ तासांत पोलिसांची कामगिरी; बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड…

फक्त २४ तासांत पोलिसांची कामगिरी; बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड...

पुणे (लोणावळा) : दिनांक १५/०७/२०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ठाकुरसाई गावात एक ३३ वर्षीय महिला ही रत्याने चालत जात असताना एका अनोळखी इसमाने दुचाकीवरून तिचा पाठलाग करून महिलेस रस्त्यात आडवून रस्त्याचे कडेला असलेल्या जंगली भागात निर्जनस्थळी नेवून तिचे इच्छेविरूध्द बळजबरीने तिचेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.

या गंभीर गुन्ह्यांची माहिती पोलीस ठाण्यास मिळाल्याने पिडत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यास गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेणेबाबत आदेश दिल्याने रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी स्वतः गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला.

गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने या गुन्हयातील नराधम आरोपी यास २४ तासाचे आत ताब्यात घेण्यात आले होते.

या आरोपीचे नाव बाळु दत्तु शिर्के रा. जिवन नं. ०१, ता. मावळ जि. पुणे असे असून त्यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगीरी ही संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग यांचे देखरेखीखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल गावडे, महिला सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे, सहा. पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सांवत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहा. फौ. सचिन घाडगे, दिपक साबळे, आसिफ शेख, पोहवा विक्रम तापकिर, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, अतुल ढेरे, तुषार भोईटे, सागर नामदास, राहुल पवार, संदीप वारे, रामदास बाबर, सिताराम बोकड, जय पवार, केतन तळपे, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर, अक्षय नवले, वैभव सावंत, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अंकुश पवार, सागर धनवे यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे या करीत आहेत.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??