“पोस्ट ऑफिसमध्ये ₹१ लाख जमा करा आणि मिळवा हमी परतावा ₹१४,६६३ ; सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम संधी!”

मुंबई : केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या पोस्ट विभागानं आपल्या ग्राहकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात बदल केला आहे. पोस्ट ऑफिसनं त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर योजनेचे सुधारित व्याजदर अपलोड केलेत.
पोस्ट ऑफिसनं विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनांवरील व्याजदर कमी केलेत, तर विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनेवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त १ लाख रुपये जमा करून १४,६६३ रुपयांचे निश्चित व्याज मिळू शकतं.
२ वर्षे आणि ३ वर्षांसाठी टीडी व्याजदर
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसनं २ वर्षे आणि ३ वर्षांच्या टीडीवरील व्याजदर कमी केलेत. पोस्ट ऑफिसनं २ वर्षांच्या टीडीवरील व्याजदर ७.० टक्क्यांवरून ६.९ टक्के आणि ३ वर्षांच्या टीडीवरील व्याजदर ७.१ टक्क्यांवरून ६.९ टक्के केले आहेत. याशिवाय, ५ वर्षांच्या टीडीवरील व्याजदर ७.५ वरून ७.७ टक्के करण्यात आलाय. १ वर्षाच्या टीडीवर पूर्वीप्रमाणेच ६.९% दरानं व्याज मिळत राहील.
१ लाखावर १४,६६३ रुपयांचं व्याज
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये २ वर्षांच्या टीडी योजनेत १ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,६६३ रुपये मिळतील. यामध्ये तुमच्या १,००,००० रुपयांच्या गुंतवणुकी व्यतिरिक्त १४,६६३ रुपयांचं निश्चित व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसची टीडी योजना अगदी बँकांच्या एफडी योजनेसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टीडी योजनेत, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर निश्चित व्याज मिळतं. आधी सांगितल्याप्रमाणेच पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते, याचा अर्थ असा की त्यात जमा केलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
(टीप – जनहितार्थ जारी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Editer sunil thorat






