नेतृत्वाचा खरा अर्थ दाखवत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी अमलबजावणी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेसाठी विविध उपक्रमांची उभारणीज्ञ; समाजात समाधानाची लाट!

पुणे (हवेली) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणी काळभोर येथे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास उदंड प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये १५५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १० नागरिकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रियेची गरज होती. त्यांना मोफत उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर ३३ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आज करण्यात आल्या व ३८० नागरिकांची रक्त, लघवी, रक्तदाब व इतर चाचण्या व विविध तपासण्या करून त्यांचेवर उपचार
मोफत झाल्यामुळे नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
तसेच घोरपडे वस्ती येथील महाविर निवासी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना बिस्किट व इतर उपयोगी वस्तू वाटण्यात आल्या.
याच समवेत तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय परिसरांत देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच राहुल काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, सोसायटीचे चेअरमन गुरुदेव काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर ,भाजप शहराध्यक्ष कमलेश काळभोर, युवा नेते सतीश काळभोर, सिद्धेश्वर काळभोर स्वप्निल काळभोर, सचिन काळभोर, किरण वाळके सुरेश काळभोर सचिन वाघोले कुणाल काळभोर दादा कोळपे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, डॉ. मेहबूब लुकडे, जाधव मॅडम यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat







