“९ दिवसांत पोलिसांचा मोठा धमाका ; अट्टल घरफोडी चोर खंडव्यातून अटक, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त!” “लोणी काळभोर पोलिसांची कारवाई..
लोणी काळभोर पोलीसांनी ९ दिवसांचे आत अट्टल घरफोडी चोरास खंडवा, मध्यप्रदेश येथुन केले अटक, ६,३९,९००/- रुपयांचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल केला जप्त...

पुणे (हवेली) : दिनांक १२/०७/२०२५ रोजी सकाळी ११/०० सुमारास इसम नाव शौकत शब्बीर मोगल वय ४३ वर्षे रा. गल्ली नंबर २, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे हे त्यांचे कुटुंबीयांसह त्यांचे राहते घरास कुलुप लावुन बार्शी येथे गेले होते. दि. १४/०७/२०२५ रोजी ते घरी परत आले असता, त्यांचे राहते घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत तसेच त्यांचे घरातील लोखंडी कपाटाचे व आतील तिजोरीचे लॉक उचकटलेले व त्यातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरीस गेल्याचे त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. १५/०७/२०२५ रोजी गु. र. नं. ३२१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ प्रमाणे फिर्याद दिलेवरुन, अज्ञात चोरटयाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी, अज्ञात आरोपीबाबत तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणेचे दृष्टीने अहोरात्र प्रभावी प्रयत्न केले. तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अंमलदार पो. शि. पाटील व पो. शि. कुदळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाले. माहितीचे अनुषंगाने, लोणी काळभोर पोलीसांनी तांत्रीक पुराव्यांची पडताळणी करुन, अज्ञात आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्यावरुन नाव प्रतिक हिराचंद लिडकर वय ३१ रा. शिवमंदिर शेजारी रामनगर, खंडवा, ता. जि. खंडवा, मध्यप्रदेश राज्य याने केली असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व परवानगीने लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक खंडवा, मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले व त्यांनी अतिशय कौशल्यपुर्णरित्या आरोपीची सदर भागातील रहिवासी यांच्या कडुन माहिती घेवुन त्याचेवर निरंतर पाळत ठेवली. आरोपी फरार कालावधीत राहत असलेल्या भागात सापळा रचुन आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी खंडवा, मध्यप्रदेश येथुन दि. २३/०७/२०२५ रोजी ताब्यात घेवुन, त्यास दाखल गुन्हयात अटक केले.
अटक आरोपीविरुध्द मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशाप्रकारचे एकुण १५ गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरिल प्रमाणे अटक आरोपीकडे, अटक मुदतीत, पोलीस कस्टडीदरम्यान तपासी अधिकारी कृष्णा बाबर, सहा. पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी, तपास करुन आरोपीने गुन्हयातील चोरुन नेलेले सोन्याचे दागीने रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ६,३९,९००/- रुपयांचा माल आरोपीकडुन जप्त केला आहे. अशाप्रकारे अतिशय कौशल्यपुर्ण व प्रभावीरित्या तपास करुन लोणी काळभोर पोलीसांनी घरफोडी सारखा गंभिर गुन्हा, बाहेर राज्यातील आरोपी असताना देखील, केवळ ९ दिवसांचे आत उघडकीस आणुन, गुन्हयातील चोरीस गेलेला १०० टक्के माल आरोपीकडुन जप्त केला आहे.
वास्तवीक पाहता सदर गुन्हा अज्ञात आरोपीतांविरुध्द दाखल असताना तसेच महाराष्ट्र बाहेर राज्यातील आरोपी बाबत काहीही माहिती प्राप्त नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अविरत प्रयत्न व कौशल्यपुर्णरित्या तपास करुन, आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. तसेच आरोपीकडुन चोरीस गेलेला सर्व ऐवज जप्त करुन, गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. हवा. सातपुते, पो. हवा. वणवे, पो. हवा. भोसले, पो. हवा. माने, पो. हवा. जगदाळे, पो. हवा. देवीकर, पो. शि. विर, पो. शि. पाटील, पो. शि. कुदळे, पो. शि. कुंभार, पो. शि. गाडे, पो. शि. कर्डीले, पो. शि. सोनवणे, पो. शि. शिरगिरे, पो. शि. दडस, म.पो.शि. थोरात यांनी तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे कार्यालयास नेमणुकीस असलेले पो. शि. अमोल जाधव यांनी केली आहे.
Editer sunil thorat



