निरा भिमा कारखाना 6 लाख मे.टन ऊस गाळपासाठी सज्ज ; भाग्यश्री पाटील…
मिल रोलर पूजन हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते संपन्न...

पुणे (इंदापूर) : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा 2025-26 ऊस गळीत हंगाम जोमात पार पडणार असून, यासाठी 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या या ऐतिहासिक 25व्या गळीत हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या नव्या मिल रोलरचे पूजन आज (रविवार, दि. 27) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना अध्यक्षा भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, “कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असून, गळीत हंगाम वेळेवर सुरू होणार आहे. गेल्या 24 वर्षांत कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. शेतकऱ्यांनी याही वर्षी आपला संपूर्ण ऊस निरा भिमा कारखान्याकडे देऊन सहकार्य करावे.”
ए. आय. तंत्रज्ञानाचा ऊस पिकात वापर नवीन तंत्रज्ञानाच्या अंगीकारासोबतच निरा भिमा कारखाना आता ऊस उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणार आहे. यामुळे खत, पाणी बचत होऊन उत्पादन खर्चात घट होईल आणि संभाव्य रोग, किडीविषयी मोबाईलवर माहिती मिळणार आहे, अशी माहिती भाग्यश्री पाटील यांनी दिली.
चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीत वाढ यंदाच्या वर्षी कार्यक्षेत्रात समाधानकारक पावसामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, दररोज सुमारे 6,500 मे. टन ऊस गाळप करण्याची यंत्रणा सज्ज आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील राहावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
या पूजन सोहळ्यास कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी केले.
संपादक डॉ गजानन टिंगरे





