मोठी बातमी | तिसरी भाषा अभ्यासक्रमातून हद्दपार! राज्य सरकारचा मोठा निर्णय, नव्या मसुद्यावर जनतेचा अभिप्राय मागवला

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी मोठा शैक्षणिक बदल करत तिसरी भाषा अभ्यासक्रमातून हद्दपार केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून, तो 28 जुलैपासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना यावर अभिप्राय नोंदवता येणार आहे.
या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कला, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि मूल्यशिक्षणाचे समावेश करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी ‘परिसर अभ्यास’ रद्द करून ‘आपल्या सभोवतालचे जग’ हा विषय लागू केला जाणार आहे.
नव्या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यांमध्ये –
सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात
नववी-दहावीमध्ये पर्यावरण व आंतरशाखीय शिक्षणावर भर
भारतीय ज्ञानप्रणाली, नैतिक मूल्ये, शाश्वत विकास यांचा समावेश
SCERT मार्फत अभ्यासक्रम रचना
त्रिभाषा धोरणाचे काय?
तिसऱ्या भाषेच्या वगळण्यामागे तात्पुरता निर्णय असून, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिभाषा धोरण अंमलबजावणी समिती शिफारशी करणार आहे. अंतिम निर्णय त्या आधारे घेतला जाणार आहे.
SCERT चे संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले की, “हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. अभिप्रायानंतर अंतिम रूप दिले जाईल.”
Editer sunil thorat





