कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन ; कोणतीही फी नाही; 13 डिसेंबर रोजी मुंबईत वितरण सोहळा…

मुंबई : स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 भगिनी आणि 25 कोकणी बांधवांना ‘कोकण रत्न पदवी’ प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान 13 डिसेंबर 2025 रोजी, शनिवार दिनांकास, मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.
पदवीप्राप्त मान्यवरांना सेमी पैठणी साडी, गोल्ड प्लेटेड मेडल आणि आकर्षक फ्रेममधील कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या सन्मानासाठी इच्छुकांनी आपले नामांकन खालील व्हॉट्सअॅप क्रमांकांवर पाठवावे, असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे:
1. संजय कोकरे (संस्थापक / अध्यक्ष) – 9224443119
2. धनंजय कुवेसकर (मुंबई अध्यक्ष) – 9869076602
3. सुखदेव पवार (संघटक) – 8082769091
महत्त्वाची सूचना : कोकण रत्न पदवीसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी फी आकारली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Editer sunil thorat




