क्राईम न्युजदेश विदेश

‘हप्ता नाही, बायको नाही!’ कर्ज थकबाकी प्रकरणात बँकेचा अजब कारनामा ; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश…

"हप्ता भर अन् बायकोला जा घेऊन!" कर्ज न फेडल्याने बँकेचा विकृत कारनामा, पतीची विनवणी फोल ठरली!

वायरल न्यूज : अनेकांना पैशांची गरज असतेच. त्यामुळे काही सामान्य लोक खासगी बँकांमधून कर्ज घेत असतात, कर्ज घेणं हे सोपं असतं, पण जेव्हा कर्जाची रक्कम आणि चक्रीव्याज या सर्व अर्थकारणाचा विपरीत परिणाम हा कर्जबाजाऱ्यांच्या भूकेवर येऊन ठेपतो.

याचमुळे त्यांना कर्ज फेडणं अगदी अवघड होऊन जातं. त्यानंतर बँकेतून कर्ज फेडण्यासाठी फोन येत असतात. काही वेळा वस्तू गहाण ठेवावी लागते. पण एका बँकेनं कर्जबाजारी पतीच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील झांशी येथील ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वचजण हादरून गेले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

झाशीतील एका रविंद्र वर्मा नावाच्या व्यक्तीची पत्नी पूजा वर्माला सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कर्ज काढलेल्या एका बँकेत जबरदस्ती ठेवण्यात आले होते. पती जेव्हा बँकेत गेला तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हाच आम्ही तुमच्या पत्नीला सोडून देऊ असं त्यांनी सांगितलं. पती रविंद्रने बँकेना अनेकदा विनंती केली असता, पत्नीला सोडलंच नाही. अंतिम क्षणी रविंद्रने 112 वर फोन केला. संबंधित प्रकरणात पोलीस हे बँकेत आले. हे सर्व पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा महिलेला सोडण्यात आले, अशी घटना उघडकीस आली.

पीडितेनं अर्जात मनातील सल व्यक्त केली

पीडिता पूजा वर्मा यांनी दिलेल्या एका अर्जात सांगितलं की, तिने 40 हजार रुपयांचे कर्ज घेतलं होते. आतापर्यंत तिने 11 हप्ते जमा केले. परंतु बँकेच्या एकूण रेकॉर्डमध्ये केवळ 8 हप्तेच भरलेले दिसत आहेत. बँक एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी तिचे तीन हप्ते हडप केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, बँक सीओ संजय यादव यांनी सोमवारी तिच्या घरी पोहोचून धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. नकार दिल्यानंतर पती-पत्नीला जबरदस्तीने बँकेत आणले गेले, बराच वेळ बसवून ठेवण्यात आले.

कानपूरातील देहातील रहिवासी बँक व्यवस्थापक अनुज कुमार यांनी सांगितलं की, महिला ही गेली 7 महिन्यांपासून हप्तेच भरत नव्हती, म्हणून तिला बोलावले गेली. त्यानंतर त्यांनी दावा केला की, महिला ही स्वत:च्या मर्जीनेच बँकेत बसली होती. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँक कर्मचारी, एजंट आणि पीडितेच्या बाजूने कसून चौकशी सुरू आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??