
पुणे (हडपसर) : डिजिटल युगात वाढत्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘सायबर वॉरियर क्लब’ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केलेला सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, समाजात सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे गौरव उद्गार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी काढले.
‘क्विक हिल फाउंडेशन’च्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी फिशिंग, रॅन्समवेअर, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके यांसारख्या सायबर गुन्ह्यांविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. अज्ञात लिंकवर क्लिक न करणे, पासवर्ड सुरक्षीत ठेवणे, पब्लिक वाय-फाय वापरताना खबरदारी घेणे या प्रतिबंधात्मक उपायांचाही यात समावेश होता.
या वेळी कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. घोंडीराम पवार, प्रा. संदीप पालवे, डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंठाळकर, सीएमए डॉ. चारुशीला गायके, डॉ. संगीता जगताप, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. विलास वाणी, प्रा. मनीषा गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा गाडेकर, सूत्रसंचालन डॉ. विलास वाणी, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत मुळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या शंकांचे समाधान करत सायबर सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे आणि अशा उपक्रमांमुळेच समाजात सुरक्षित डिजिटल व्यवहारांची साखळी निर्माण होईल, असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
Editer sunil thorat





