
पुणे : ‘महसूल सप्ताह 2025 निमित्ताने जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे पडताळणी करुन अनुदानाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
या उपक्रमाअंतर्गत जुन्नर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 40 आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनातील 31 याप्रमाणे आंबेगाव तालुक्यात 49 व 37, अप्पर तहसील पिंपरी चिंचवड 23 व 20, अप्पर तहसील लोणी काळभोर 203 व 71, हवेली 180 व 420, मावळ 17 व 10, मुळशी 15 व 17, इंदापूर 21 व 5, खेड 143 व 112, शिरूर 14 व 16, भोर 113 व 27, वेल्हा 65 व 28, बारामती 142 व 115, पुरंदर 9 व 7 आणि दौंड तालुक्यात 142 व 115 लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना 53 आणि श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेची 17 प्रकरणे नव्याने मंजूर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कळविले आहे.
Editer sunil thorat




