
पुणे (हडपसर) : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीचा वेगाने वाढता धोका लक्षात घेऊन अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा दिना’निमित्त आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. महाविद्यालयातील ‘सायबर वॉरियर्स’ टीमने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आकर्षक “Selfie Point” तयार केला, ज्यातून महत्त्वाचे संदेश पोहोचवण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विलास वाणी आणि प्रा. मनीषा गाडेकर हे मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनावेळी प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. स्वतःची व आपल्या माहितीची सुरक्षा हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
इतर मान्यवरांनीही सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी आवश्यक टिप्स दिल्या आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा उपायांविषयी माहिती दिली.
या सेल्फी पॉइंट उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता व सजगता वाढली. उपस्थितांनी ‘सायबर वॉरियर्स’ टीमच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
Editer sunil thorat






