विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी ; थेऊर येथील पिकअप चालकावर विनयभंगाचा गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : कामावरून घरी जाणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेकडे घरी सोडण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करून छेडछाड केल्याप्रकरणी पिकअप चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गाढवे वस्ती परिसरात शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, नंदु जाधव (वय २५, रा. जाधव वस्ती, थेऊर) हा आरोपी पिकअप घेऊन थेऊर फाट्यावरून जात असताना फिर्यादी व तिची जाऊ घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होत्या. जाधवने त्यांना गाडीत बसवून घरी सोडण्याचे सांगितले. मात्र गाढवे वस्तीजवळ पोहोचल्यावर आरोपीने आंधाराचा फायदा घेत विवाहितेच्या मांडीला स्पर्श केला.
दोघींनी उतरण्याची तयारी दर्शवली असता, आरोपीने पैसे न घेता “मला खुश करा” असे अश्लील वक्तव्य केले. या वर्तनामुळे पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नंदु जाधव याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.
Editer sunil thorat




