
पुणे (हडपसर) : १२ ऑगस्ट २०२५ ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (जे.एस.पी.एम., हडपसर संकुल) येथे लायब्ररी विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. अनिल पोले, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसीचे ग्रंथपाल श्री. विष्णु ठोंबरे आणि जयवंतराव सावंत पॉलिटेक्निकच्या ग्रंथपाल सौ. पद्मजा कोकाटे उपस्थित होते.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व, ज्ञानार्जनातील त्याची भूमिका आणि उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन केले.
कॉलेजचे ग्रंथपाल श्री. विवेक थोरात यांनी आधुनिक ग्रंथालय सेवा, ई-बुक्स आणि ऑनलाइन जर्नल्सची माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. अनिल पोले यांनी ग्रंथालयशास्त्र आणि माहितीशास्त्र विषयाचे महत्व तसेच या क्षेत्रातील भविष्यातील संधी यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात ‘बेस्ट बुक रीडर अवॉर्ड’ देऊन विद्यार्थिनी कु. प्रणाली सातव, कु. अनुष्का मोरे आणि सौ. काजल जाधव यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थिनींनी वर्षभरात ग्रंथालयातील मुद्रित व डिजिटल साधनांचा सर्वाधिक व योग्य वापर केला होता.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. सागर सोनार, प्रा. अजय साळुंके तसेच प्रियांका महाजन, स्वप्नाली सावंत, वैष्णवी तानवडे, स्वाती माकोने, सुरवसे व चांदणे मावशी, पांडुरंग पवार काका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Editer sunil thorat







